डोंबिवली : तरुणाईला मागे टाकत घाटावर ज्येष्ठांची स्टंटबाजी | पुढारी

डोंबिवली : तरुणाईला मागे टाकत घाटावर ज्येष्ठांची स्टंटबाजी

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवली मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. खाडीचा किनारपट्टा आणि खाडीपासून जवळपास १०० मीटर अंतर जलमय झाले आहे. दरम्यान डोंबिवलीतल्या गणेश घाटावर स्टंटबाजी सुरू असल्याचे समोर आले. ही स्टंटबाजी तरुणांकडून नव्हेतर वयस्‍कर व्यक्तींकडून होत असल्याचे निदर्शनास आले. ही स्टंटबाजी या वयस्कर लोकांना महागात पडू शकते, हे खाडीला आलेल्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे दिसून येते.

एकीकडे तरुणाईला स्टंटबाजी करताना आपण पाहिले आहे. मात्र आता तर चक्क जेष्ठ नागरिक स्टंटबाजी करताना आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या ज्येष्ठ नागरिकांपैकी एकाने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. यात एक ज्येष्ठ गणेश घाटावर लावलेल्या लोखंडी रेलिंगवर बसला असून दोन्ही हात मोकळे सोडून आनंद घेत आहेत. दुसरीकडे काही जण त्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

गणेश घाट परिसरात पाण्याने तुडुंब भरला आहे. ज्या ठिकाणी स्टंटबाजी सुरू आहे त्याच्या मागील बाजूस खाडी पूर्णपणे भरली आहे. अशावेळी हे जेष्ठ नागरिक आपला जीव धोक्यात घालून या लोखंडी रेलिंगवर आणि कठड्यावर स्टंटबाजी करताना आढळून आले आहेत. मात्र ही स्टंटबाजी या ज्येष्ठांच्या जीवावर बेतू शकते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मात्र या संदर्भात सदर स्टंटबाजांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

 

Back to top button