मुख्यमंत्री दालनात पहिल्यांदा लावला आनंद दिघेंचा फोटो | पुढारी

मुख्यमंत्री दालनात पहिल्यांदा लावला आनंद दिघेंचा फोटो

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर पहिल्यादांच मुख्यमंत्री दालनात स्वर्गीय आनंद दिघे यांचा फोटो (छायाचित्र) लावण्यात आला आहे. आनंद दिघे यांचे छायाचित्र मुख्यमंत्र्यांच्या दालनात लागल्यामुळे शिवसैनिकांमच्ये देखील उत्साह निर्माण झाला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या माजी नागरसेवकांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

मुख्यमंत्री दालनात बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबत धर्मवीर आनंद दिघे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. हा फोटो दालनात लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर त्यांचा एक सैनिक विराजमान झाला आहे, त्याच दालनात दिघे साहेबांचा वावर आहे, अशी भावना सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया माजी महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.

आनंद दिघे यांना गुरुवर्य मानणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दालनात आनंद दिघे यांचे छयाचित्र लावून सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये आदराचे स्थान मिळविले असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य शिवसैनिकांनी दिली आहे.

हेही वाचलंत का? 

सामान्य माणसाच्या लढ्यासाठी दिघेंनी जे उभे आयुष्य खर्च केले. त्या आयुष्याला आज ख-या अर्थाने महाराष्ट्राने ‘सलाम’ केला आहे. त्यामुळे आज मंत्रालयावर शिवसेना भाजपा युती सरकारचा भगवा झेंडा फडकतो आहे. त्या भगव्यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचाही भगवा मिसळला आहे, त्यांच्यासमोर उभं राहून साहेब ‘जय महाराष्ट्र’ असे जोराने म्हणावेसे वाटते.
– नरेश म्हस्के ( माजी महापौर, ठाणे)

Back to top button