पिंपरी: चारचाकी गाडीसाठी आवडीचा नंबर घेण्याची संधी; आरटीओची नवीन केएफ सिरीज येणार | पुढारी

पिंपरी: चारचाकी गाडीसाठी आवडीचा नंबर घेण्याची संधी; आरटीओची नवीन केएफ सिरीज येणार

पिंपरी: चारचाकी वाहनांसाठी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने नवीन केएफ मालिका सुरु करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक, पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. वाहनांची मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी होते.

परिणामी कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पड़तो व नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी व्हावा व हवा तो आकर्षक क्रमांक सुलभतेने मिळावा, यासाठी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्कासह हवे असतील त्यांनी 11 जुलै रोजी कार्यालयीन वेळेत स. 11 ते दु. 2 दरम्यान कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात अर्ज करावा. सोबत ऊध.ठ.ढ.ज.झखचझठख उकखछउकथ-ऊ यानावाचा डी. डी, पत्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखत्र पॅनकार्डाच्या साक्षांकित प्रत जमा करावी.

दरम्यान, चारचाकी वाहन क्रमांकाची यादी 12 जुलै रोजी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर दु. 3.30 वा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने शुल्कापेक्षा जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

Back to top button