ठाण्यातील ६१ माजी नगरसेवकांनी दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा | पुढारी

ठाण्यातील ६१ माजी नगरसेवकांनी दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा

ठाणे; पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यातील शिवसेना आमदार, नगरसेवक यांचा पाठिंबा वाढत आहे. ४० आमदार त्यांच्यासोबत आहेत. ठाण्यात जंगी स्वागत केल्यानंतर खासदार, नगरसेवक यांच्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यात प्रचंड पाऊस असल्याने नगरसेवकांना प्रत्यक्षात भेटता आले नाहीत.

राज्यातील बदलते राजकारण आणि नाराजी पाहता ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आपापले समर्थक वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघ आणि समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी आपली भूमिका स्पष्ट करीत मुख्यमंत्री शिंदे यांचे हात अधिक बळकट करण्याची विनंती केली.

दुसरीकडे खासदार राजन विचारे यांच्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेतील महत्त्‍वाची जबाबदारी सोपविली आणि अखंड शिवसेना शिंदे यांच्यासोबत नसल्याचे संकेत दिले. असे असताना बुधवारी रात्री ठाण्यातील ६१ नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईतील नंदनवण येथील शासकीय निवासस्थानी भेटून सदिच्छा भेट देत पाठींबा दिला. ठाण्यात रात्री उशीर झाल्याने आणि प्रचंड पाऊस असल्याने प्रत्येक नगरसेवकांना भेटता आले नाही, मात्र, रात्री मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व माजी नगरसेवकांचे स्वागत स्वीकारले, त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल सर्वाचे आभार मानले.

यावेळी खासदार राजन विचारे यांच्या नगरसेविका असलेल्या पत्नी, कलव्यातील अनिता गौरी, परिषा सरनाईक आणि अन्य चार माजी नगरसेवक हे हजर नव्हते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रुप फोटो काढून त्यांचे आभार मानले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे, आमदार रवींद्र फाटक आदी नेते उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button