ठाणे : बदलापूरात फुट ओवर पुलाचे गार्डर टाकण्याच्या कामास सुरूवात; तीन तासांचा मेगाब्लॉक | पुढारी

ठाणे : बदलापूरात फुट ओवर पुलाचे गार्डर टाकण्याच्या कामास सुरूवात; तीन तासांचा मेगाब्लॉक

बदलापूर; पुढारी वृत्तसेवा: मध्य रेल्वेवरील बदलापूर रेल्वे स्थानकातील कर्जत दिशेकडे असलेल्या फुट ओवर ब्रिजच्या कामाला सुरुवात झाली आहे. या पुलाच्या कामाचा महत्त्वाचा टप्पा पार पडत असून, क्रेनच्या माध्यमातून हे गार्डर टाकण्यात येत आहेत. एकूण बारा गार्डर टाकण्यात येणार असून, त्यासाठी मध्य रेल्वेने तीन तासांचा विशेष मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकमुळे अंबरनाथ ते कर्जत या मार्गावरील वाहतूक दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूरकरांची कर्जत दिशेला नवीन एफओबी तयार करून तो रेल्वे स्टेशनवर उतरावा, अशी मागणी होती, ती रेल्वेने पूर्ण केली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असे संबधित अधिकाऱ्यांने सांगितले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button