Metro Land Acquisition : मेट्रो मार्गातील बाधित जागेचा आ. नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीला २४ कोटींचा मोबदला?

१६ एप्रिल रोजीच्या शासन निर्णयावरून मोबदला देण्यावर मात्र संभ्रम
Metro Land Acquisition
आ. नरेंद्र मेहताpudhari photo
Published on
Updated on

भाईंदर : राजू काळे

दहिसर ते काशिगाव मेट्रो मार्गातील काशिगाव स्थानकाबाहेर आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीची जागा असून ती तेथील रस्त्यात बाधित झाल्याने त्या जागेचा बाजारभावानुसार आर्थिक मोबदला देण्याची मागणी कंपनीने पालिकेकडे केली आहे. त्यापोटी तब्बल २४ कोटींचा आर्थिक मोबदला उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विभागाने निश्चित करून त्यातील ३० टक्के मोबदला जमा करण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत. मात्र राज्य शासनाने १६ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या शहर विकास योजेनेच्या अधिसूचनेतीलनुसार कंपनीला बाधित जागेचा मोबदला देण्यावर संभ्रम निर्माण झाला आहे.

दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशिगाव दरम्यानची मेट्रो रेल्वे ७ एप्रिल रोजी सुरु करण्यात आली. काशिगाव ते भाईंदर दरम्यानचा दुसरा टप्पा डिसेंबर अखेरीस सुरु करण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. तत्पूर्वी सुरु करण्यात आलेल्या दहिसर ते काशिगाव दरम्यानच्या काशिगाव मेट्रो स्थानकाबाहेर मेट्रो स्थानकांच्या एंट्री व एक्झिट पॉइंट्स (जिने) ओस्तवाल बिल्डर व आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीच्या जागेमुळे बाधित होत असल्याने या जागेचा बाजारभावाने आर्थिक मोबदला देण्याची मागणी सेव्हन इलेव्हन कंपनीकडून पालिकेकडे करण्यात आली आहे.

Metro Land Acquisition
Nigdi Chakan Metro: निगडी–चाकण मेट्रो डीपीआर रखडला; मंजुरीअभावी प्रकल्प लांबणीवर

हा मेट्रो प्रकल्प एमएमआरडीएकडून राबविण्यात आला असला तरी मेट्रो मार्गासाठी भूसंपादनाची जबाबदारी पालिकेवर सोपविण्यात आल्याने कंपनीने पालिकेकडे आर्थिक मोबदल्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. यामुळे काशिगाव मेट्रो स्थानकातील त्या जागेतील २ एन्ट्री-एक्झिट पॉईंट्सचे काम प्रलंबित ठेवण्यात आले आहे. कंपनीच्या आर्थिक मोबदल्याच्या मागणीवर पालिकेने कंपनीला आर्थिक मोबदल्याऐवजी सुरुवातीला टिडीआर देण्याची तयारी दर्शविली. तर कंपनी टिडीआरच्या मोबदल्याऐवजी आर्थिक मोबदलाच देण्याची मागणी रेटून धरल्याने या जागेअभावी काशिगाव स्थानकातील एंट्री- एक्झिट पॉईंटचे बांधकाम रेंगाळले आहे.

पालिका हद्दीतील मौजे मिरा येथील सर्वे क्रमांक १६ वरील एकुण १२ हजार २२० चौरस मीटर जागेपैकी २ हजार ९०९ चौ. मी. तर सर्वे क्रमांक ७ वरील एकूण ११ हजार ६० चौ. मी. जागेपैकी ६३८ चौ. मी. अशी एकूण ३ हजार ५४७ चौ. मी. जागा मेहता यांच्या मेसर्स सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात येत आहे. हि जागा पालिकेच्या मीरारोड ते काशिमीराकडे जाणाऱ्या ४५ मीटरच्या प्रस्तावित डीपी रोडने बाधित होत आहे.

Metro Land Acquisition
Mumbai mega projects: महामुंबईत मेट्रो, बुलेट ट्रेनसह सागरी महामार्ग ठरणार गेमचेंजर

हि बाधित जागा डीपी रस्त्यासह मेट्रो मार्गासाठी एमएमआरडीएकडे हस्तांतरीत करण्यासाठी पालिकेने वारंवार कंपनीकडे मागणी केली होती..यावर कंपनीने देखील पालिकेला अनेकदा पत्र व्यवहार करीत या जागेच्या मोबदल्यात कंपनीला टिडीआर न देता बाजारभावानुसार आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी केली. मात्र दरम्यानच्या काळात पालिकेकडून त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे मेहता यांनी मेट्रोचे काम थांबविल्याचा आरोप करण्यात आला.

पालिकेवर आर्थिक डोंगर

आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीला पालिकेकडून आर्थिक मोबदला मिळणार असल्याच्या वृत्ताने मेट्रो मार्गात बाधित झालेल्या इतर जागा मालकांनी देखील पालिकेला पत्रव्यवहार करून आर्थिक मोबदला देण्याची मागणी केली आहे. यामुळे पालिकेवर आर्थिक डोंगर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यावर आयुक्त कोणती भूमिका घेणार, हे पहावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news