Ration Card News : राज्यातील १८ लाख रेशन कार्ड रद्द; सर्वाधिक मुंबईतील

मुदत संपूनही १ कोटी ६५ लाख कार्डाची ई-केवायसी प्रलंबित
18 lakh ration cards cancelled in the state; most of them from Mumbai
रेशन कार्डांची तपासणी होणारFile Photo
Published on
Updated on

ठाणे : दिलीप शिंदे

रेशन कार्डला आधार क्रमांक लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी मोहीम राबविली आहे. रेशन कार्ड धारकांनी ई-केवायसी न केल्यास शिधापत्रिका रद्द करण्याचा इशारा देण्यात आला होता. तरीदेखील महाराष्ट्रातील तब्बल १ कोटी ६५ लाख ३३ हजार ९५६ रेशन कार्डधारकांनी ३० एप्रिलची मुदत संपूनही केवायसी केलेली नाही. धक्कादायक म्हणजे ई-केवायसी केलेल्या कागदपत्रांच्या छाननीनंतर राज्यभरातील तब्बल १७लाख ९५ हजार ५५३ रेशन कार्ड विविध कारणास्तव रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ४ लाख ८० हजार २८ रेशन कार्ड हे एकट्या मुंबईतील आहेत.

18 lakh ration cards cancelled in the state; most of them from Mumbai
best bus : लाडक्या बेस्टवर मुंबईकर प्रवासी रुसले!

मुंबई, ठाणे जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रांच्या आधारे रेशन कार्ड काढण्यात आलेले आहेत. त्यात बांगला देशी नागरिकांनाही सहजपणे रेशन कार्ड मिळत आहेत. रेशन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे रेशन कार्ड सहजपणे देशभरातील कुठल्याही राज्यातील नागरिकांना उपलब्ध होत आहेत. उलट स्थानिकांना रेशन कार्ड काढताना कागदपत्रांच्या नावाखाली अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे केंद्र सरकारने रेशन कार्डला आधार कार्डचा क्रमांक जोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी दोनदा मुदतवाढही देण्यात आलेली होती. आता ३० एप्रिलपर्यंत ई केवायसी करण्याची अंतिम मुदत होती.

दीड कोटी कार्डधारकांची ई-केवायसी बाकी

महाराष्ट्रातील ४२ जिल्हे तसेच रेशन विभागांमधील ६ कोटी ८५ लाख ९६ हजार ८०६ रेशन कार्ड धारकांपैकी ५ कोटी २० लाख ६२ हजार ८५० रेशन कार्डचे ई-केवायसी पूर्ण झालेले आहे. मात्र, त्या सगळ्यांच्या कागदपत्रांची तपासणी अद्याप पूर्ण झालेली नाही. ज्या रेशन कार्डच्या ई-केवायसीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी तब्बल १७ लाख ९५ हजार ५५३ रेशन कार्ड विविध कारणास्तव रद्द करण्यात आले आहेत. अद्याप १ कोटी ६५ लाख ३३ हजार ९५६ कार्डधारकांची ई-केवायसी व्हायची असून, त्यांच्या कागदपत्रांची तपासणीही होणार आहे.

18 lakh ration cards cancelled in the state; most of them from Mumbai
हवालदार, पोलीस शिपायांनाही गुन्हे तपासाचा मिळाला अधिकार

रेशन कार्ड रह केलेले आघाडीचे विभाग

जिल्हा/विभाग एकूण कार्ड रद्द केवायसी प्रलंबित

मुंबई ४३,६९, ७१८ ४,८०,०२८ १२,२९,४४३

ठाणे (फ) २६,४०, ४७२ १,३५, ७०८ ५,३०,२४३

सांगली १८,३९, ६३८ १,०२, १९१ ४, ३९,२७३

परभणी १२,८०, ४५५ ६४, ८९० ३, ६२,७५९

रायगड १७,६०,१५९ ५९,८९१ ५,०७, २६९

पालघर १८,७१, ५५५ ५९, ८०४ ५, ३०,१६८

जिल्हा एकूण कार्डधारक केवायसी तपासणी रद्द कार्ड मंजूर मंजूर टक्केवारी

भंडारा १०,२०,१४९ २,९९,१८३ ११,७७० ५,५८,९९४ ८३.३४

गोंदिया १०,९८,५४५ २,२८,९७७ ३८,२८६ ६,८६,१६० ८३.२२

सातारा १७,८३,७७५ ६,०४,३१६ ३५,६७३ ८,४०,५१३ ८०.९५

कोल्हापूर २५,२२,१५५ १९,४९,६८३ ४२,०६५ ९,९१,२०५ ८०.९२

नाशिक ३८,५७,५७४ १३,४५,४८२ १७,४०७ १७,६२,७२० ८०.५७

संभाजीनगर २३,७४,२५३ ८,०३,६६७ १३,५६१ ११,०३,९८९ ८०.३५

ठाणे (फ) २६,४०,४७२ ३६,२२४ १,३५, ७०८ २०,०९,७१३ ७९.९२

ई-केवायसी करण्यात भंडारा आघाडीवर

तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर असलेल्या शहरांना मागे टाकत भंडारा जिल्ह्याने रेशन कार्ड ई-केवायसी करण्यामध्ये आघाडी घेतली असून, दुसऱ्या क्रमांकावर गोंदिया जिल्हा आहे. सातारा तिसऱ्या, कोल्हापूर चौथ्या, नाशिक जिल्हा पाचव्या स्थानी असून, संभाजीनगर सहाव्या, तर ठाणे सातव्या स्थानी आहे. संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्रास वापर करणाऱ्या मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारखी शहरे ई-केवायसी करण्यामध्ये मागे पडलेली दिसून येतात. मुंबईमधील ४३ लाख ६९ हजार ७१८ रेशन काडाँपैकी १२ लाख २९ हजार ४४३ रेशन कार्डचे केवायसी प्रलंबित आहेत.

योजनांचा लाभ मिळत राहणार

संपली असली, तरी अद्याप प्रलंबित असलेल्या शिधापत्रिकांना सरकारी योजनांपासून वंचित ठेवण्याबाबत कोणतेही निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाला देण्यात आलेले नाहीत. मोठ्या प्रमाणावर केवायसी शिल्लक असल्याने सरकारचे निर्देश येईपर्यंत केवायसीची मोहीम सुरूच राहणार असून, त्या रेशन कार्ड धारकांना योजनांचा लाभ दिला जाणार असल्याचे शिधावाटप अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबईनंतर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक कार्ड रद्द

मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रेशन कार्ड रद्द झालेले आहेत. ठाण्याच्या परिमंडळातील २६ लाख ४० हजार ४७२ शिधापत्रिकांपैकी ५ लाख ३० हजार २४३ रेशन कार्डधारकांची केवायसी प्रलंबित असून, तब्बल १ लाख ३५ हजार ७०८ रेशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहेत. त्यात मुंब्रा, कळव्यातील काडाँचा अधिक समावेश आहे. तर ठाणे ग्रामीणमधील १६ हजार ३३९ रेशन कार्ड रद्द करण्यात आले असून, ६ लाख ६१ हजार २०७ पैकी १ लाख ६५ हजार ७४ रेशन कार्डची केवायसी करणारे बाकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news