ठाणे : झेडपी शिक्षकाला अपहरण करून लुटले | पुढारी

ठाणे : झेडपी शिक्षकाला अपहरण करून लुटले

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्हा परिषदेच्या मलंगगड भागातील ढोके केंद्रावर शिकवणाऱ्या शिक्षकाचे अपहरण केले. जगदीश पवार असे या शिक्षकांचे नाव आहे. बुधवारी (दि.20) सकाळी नियमितपणे ते आपल्या कल्याण पश्चिमेतील घरून शाळेत जात होते.

मात्र सकाळी कल्याण पूर्वेतील नांदीवली परिसरातील आरोपी प्रथमेश वाकुर्ले हा तरुण घरी जाण्यासाठी शिक्षक पवार यांना हात करू लागला. शिक्षकाने देखील ओळखीचा तरुण असल्याने त्‍याला ढोके गावात जाण्यासाठी आपल्या चारचाकी वाहनात बसविले. काही अंतरावर आरोपी प्रथमेश याने दोन साथीदारांना शिक्षकाच्या गाडीत घेतले.

त्यानंतर शिक्षक पवार यांना महिलेशी संबंध असल्याच्या जाब विचारण्यासाठी तिच्या मामाकडे घेऊन जात असे सांगितले. आणि त्यांच्या गळ्याला चाँपर लावून त्यांना बदलापूर परिसरातील मुळगावच्या पुढे असलेल्या एका जंगलात घेऊन गेले. तेथे त्यांनी शिक्षकाला कच्ची दारू पाजून त्यांच्या खिशातील पैसे, गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली. आणि फोनपे द्वारे पैसे ट्रान्स्फर करून घेतले. तसेच गळ्याला चाँपर लावून धार्मिक तेढ निर्माण होतील आणि महिलांना त्रास होईल असे व्हीडिओ तयार केले.

यानंतर पोलिसात तक्रार केली तर व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आणि तक्रार करणार नाही असे सांगितल्यानंतर शिक्षकाला पुन्हा कल्याण परिसरात सोडले. त्यानंतर हे तिघे जण पसार झाले. दरम्यान, सर्व घटनेची माहिती शिक्षक पवार यांनी आपल्या मित्रांसह पोलिसांना दिली. त्‍यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. आणि तिघांविरूदृध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा  

Back to top button