इंद्रजीत सावंत : ‘शिवरायांचा खरा इतिहास फुले, शाहू, आंबेडकरांनी घराघरांत पोहोचवला’ | पुढारी

इंद्रजीत सावंत : 'शिवरायांचा खरा इतिहास फुले, शाहू, आंबेडकरांनी घराघरांत पोहोचवला'

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा घेत बाबासाहेब पुरंदरेंचे कौतुक केले. याचबरोबर पुरंदरेंनी शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवल्याचे राज ठाकरे सभेत म्हणाले. यावर राजकीय पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणावर शिवप्रेमींना आक्षेप घेतला आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी ठाकरे यांच्या भाषणातील काही मुद्यांवर आक्षेप घेत सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

राज ठाकरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास पुरंदरेंनी घराघरात पोहोचवला हे वक्तव्य केले यावरून राज यांचे इतिहासाचे आकलन खूपच कमी असल्याचे दिसून येते. राज यांनी त्यांच्या झेंड्यावर मुद्रा वापरली ही मुद्रा शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली होती. हीच शिवमुद्रा त्यांनी आपल्या झेड्यावर वापरत असताना त्या मुद्रेवरील कॅलीग्राफी आहेत ती त्यांनी बदलली असल्याचे सावंत म्हणाले.

महाराजांच्या मुद्रेला इतिहासात खूप महत्वाचे स्थान आहे याचबरोबर इतिहास अभ्यासकांना मुद्रा हे अभ्यासाचे महत्वाचे साधन असते. कॅलिग्राफी बदलेली मुद्रा राज ठाकरेंनी आपल्या झेंड्यावर आणि लेटर हेडवर छापली आहे ती अत्यंत चुकीची असल्याचे सावंत म्हणाले. बाबासाहेब पुरंदरेचे मार्गदर्शन असून देखील ते चुकीची मुद्रा वापरतात असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

इंद्रजीत सावंत : राज यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे

राज ठाकरे यांनी त्यांचे आजोबा प्रभोधनकार ठाकरे यांनी लिखाण केले आहे त्याचा त्यांनी अभ्यास करावा यावरून त्यांच्या लक्षात येईल नेमका ब्राम्हणवाद किती वर्षाचा आहे त्या पाठीमागे काय इतिहास आहे याची माहिती त्यांनी मिळेल.

महाराष्ट्रातील शाहू, फुले आणि आंबेडकर या बहूजन समाजातील थोरांना जागरूक करण्याचे काम प्रभोधनकार ठाकरे यांनी केले. शाहु, फुले आणि आंबेडकर यांच्या माध्यमातूनच शिवाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरात पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे.

खरे शिवाजी महाराज या तीन महामानवांच्या कृतीतून दिसून येतात. यावरून राज ठाकरे जे वक्तव्य करत आहेत. यातून महाराष्ट्राच्या इतिहासाचे चुकीचे आकलन त्यांना असल्याचे दिसून येते. संभाजी ब्रिगेड असेल किंवा इतर संघटना असतील त्यांनी महापुरूषांचा खरा इतिहास घराघरात पोहोचवला असे म्हंटले तरी वावगं ठरणार नाही असे इंद्रजीत सावंत म्हणाले.

Back to top button