ठाणे : दारू, सिगारेट, तंबाखूचे दहन करत विद्यार्थ्यांनी साजरी केली होळी | पुढारी

ठाणे : दारू, सिगारेट, तंबाखूचे दहन करत विद्यार्थ्यांनी साजरी केली होळी

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

होळीचा सण आज संपूर्ण देशभर साजरा होत आहे. देशाच्या अनेक भागात हा सण भांग, दारू पिऊन साजरा करतात. तर आदिवासी नागरिक त्यांच्या पारंपरिक गाण्यावर ठेका धरतात. तर कोकणात पालख्या नाचवल्या जातात. मात्र शहापुरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभुळपाडा केंद्र सापगाव येथील विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ होळीत टाकून त्याचे दहन करत हा सण साजरा केला आहे.
ठाणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शहापूर तालुका आदिवासी बहुल असा तालुका आहे. या तालुक्यातील रहिवासी अद्यापही अनेक सोयीसुविधांपासून वंचित आहेत. मात्र, या तालुक्यात शिकणारे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, चांगले शिक्षण घ्यावे यासाठी अनेक शिक्षक या तालुक्यात धडपडताना दिसतात.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभुळपाडा केंद्र सापगाव शाळेचे शिक्षक धीरज डोंगरे यांनी मुलांसमोर आदर्श निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केला. यासाठी आज होलिकेचे दहन करताना विद्यार्थ्यांच्या हातात पाच लिटर गावठी दारू,२० सिगारेट पॅकेट्स,३० तंबाखू पुड्या, ४० मशारीच्या पुड्या आणि ५० गुटख्याची पॅकेट्स हे सर्व दिले. त्यांनतर मुलांनी हे सर्व होळीत टाकले. त्यानंतर भरपेट नाश्ता, खेळ आणि गप्पा गोष्टी करत हा सण विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी साजरा केला.

होळी म्हणजे आपल्यामधील वाईट गुणांना पेटत्या निखाऱ्यात टाकून तिलांजली देणे. माझ्या मुलांनी गावाला लागलेल्या व्यसनांना तिलांजली देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आज इतकंच!

-डोंगरे गुरुजी

 

Back to top button