ठाणे : समीर वानखेडे कोपरी पोलीस ठाण्यात हजर | पुढारी

ठाणे : समीर वानखेडे कोपरी पोलीस ठाण्यात हजर

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबईतील बारच्या मद्यविक्री परवान्यासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्‍यांना कोपरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार वानखेडे यांनी आज सकाळी 11.30 च्या सुमारास पोलीस ठाण्यात हजेरी लावली. अद्याप त्यांची चौकशी सुरू असून यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी ही उपस्थित आहेत.

तसेच, सतराव्या वर्षी वानखेडेंना बारचा परवाना कसा मिळाला? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर उत्पादन शुल्क विभाग या प्रकरणाची चौकशी करीत होते. तसेच ठाणे प्रशासनाकडे याचा अहवाल सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी बार परवाना रद्द करण्याचे आदेश दिले होते.

यामध्ये त्यांच्या नावे नवी मुंबईत असलेला हॉटेल सदगुरु बार आणि रेस्टॉरंटचा परवाना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. यानंतर वानखेडे यांच्या विरोधात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. वयाच्या 17व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, हॉटेल्सच्या लायसन्समध्ये वयाचा पुरावा नसल्याने, काही त्रुटी असल्‍याने या प्रकरणी नवी मुंबईत वानखेडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचालं का  

Back to top button