ठाणे : पिस्तुल विक्री करणाऱ्यास अटक; पिस्तुल, जिवंत काडतुसांसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त | पुढारी

ठाणे : पिस्तुल विक्री करणाऱ्यास अटक; पिस्तुल, जिवंत काडतुसांसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा

पिस्तुल विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि मोटारसायकलसह सुमारे १ लाख २ हजार ९०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे. गणेश राजवंशी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजवंशी याच्यावर यापूर्वीही डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

राजवंशी हा मूळचा हरियाणा येथील आहे. सध्या तो घणसोली येथे वास्तव्यास आहे. पोलीसांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ऑल ऊट ऑपरेशनवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना अनंत रिजन्सी या ठिकाणी एक व्यक्ती पिस्तुल विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीसांच्‍या दोन पथकांनी सापळा रचला. राजवंशी याला अटक केली.त्यानंतर त्याच्याकडून देशी व गावठी कट्ट्याची ६ जिवंत काडतुसे, १ गावठी कट्टा, १ देशी बनावटीचे पिस्तूल , रोख रक्कम आणि काळ्या रंगाची मोटरसायकल हस्तगत केली. राजवंशी याला न्यायालयात उभे केले असता ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

भयानक ! कसारा घाटात गेल्या पाच महिन्यांत झाले इतके अपघात, एवढे मृत्यू

पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोले आणि महात्मा फुले ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी या गुन्‍ह्याचा छडा लावला.

हेही वाचलं का? 

Back to top button