सोलापूर : सीना नदीत मासे पकडायला गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू

मोहोळमधील आष्टे बंधाऱ्यावरील घटना
Solapur drowning incident
सीना नदीत बुडून तरूणाचा मृत्यू
Published on
Updated on

पोखरापूर : मोहोळ तालुक्यातील आष्टे बंधाऱ्यावर सीना नदीपात्रात मासे पकडायला गेलेल्या ३६ वर्षीय तरुणाचा पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार (दि.२९) सकाळी ९:३० च्या दरम्यान उघडकीस आली. नंदकुमार रुद्राप्पा जवंजाळ असे मृत तरुणाचे नाव आहे.

Solapur drowning incident
कोल्हापूर जिल्ह्यात तीन वर्षांत 2 हजार रुग्णांचा हृदयविकाराने मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी, मोहोळ रेल्वे स्टेशन येथील नंदकुमार जवंजाळ हा तरुण मोलमजुरी करतो. मोहोळ तालुक्यातुन जाणाऱ्या सीना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शनिवार (दि. २८) दुपारी ११ : ३० वाजण्याच्या दरम्यान आष्टे येथील बंधाऱ्यावर नंदकुमार जवंजाळ हा गळ घेऊन मासे पकडण्यासाठी गेला होता. सीना नदीच्या पात्रालगत बसून मासे पकडत असताना त्याचा पाय घसरून तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर महसूल व पोलीस प्रशासनाने शोधमोहीम केली मात्र तो शनिवारी मिळून आला नाही. दरम्यान रविवारी सकाळी ९ : ३० वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी शिरापूर बंधाऱ्यालगत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असता तो मृतदेह जवंजाळ याचा असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढून मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Solapur drowning incident
वर्धा : अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news