वर्धा : अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू

तीन महिला गंभीर जखमी
Farmer woman died due to lightning strike
अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी महिलेचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

वर्धा : जुवाडी शिवार येथे शेतामध्ये काम करत असताना एका महिलेच्या अंगावर गुरुवारी (दि.26) वीज कोसळली. यामध्ये त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेसोबत काम करणाऱ्या तीन शेतमजूर महिला जखमी झाल्या आहेत. मंदा प्रभाकर वाघमारे (वय.५५ रा. जुवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर जखमी महिलांना सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Farmer woman died due to lightning strike
अंगावर वीज पडल्याने दोन कामगारांचा जागीच मृत्यू

जुवाडी येथील शेतकरी प्रभाकर वाघमारे हे त्यांच्या पत्नीसह शेतामध्ये गेले होते. यावेळी महिला मजुरही सोबत होत्या. दरम्यान दुपारी चार वाजताच्या सुमारास जुवाडी परिसरातील शेतशिवारात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी सगळे शेती कामात व्यस्त असताना अचानक शेतात वीज कोसळली. यामध्ये मंदा यांचा जागीच मृत्यू झाला. तर अर्चना तुकाराम दाभेकर (वय३६), किरण लती वाल्हे (वय३०) आणि उर्मिला दिलीप कोल्हे (वय३२) तीनही रा. जुवाडी यांना जबर धक्का बसल्याने त्या जखमी झाल्यात. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी सेलू पोलिसांनी भेट देत पंचनामा केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news