सोलापूर : येवती जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक निलंबित

सोलापूर : येवती जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक निलंबित
Published on
Updated on

मोहोळ, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने नियमबाह्य पद्धतीने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवडून शालेय पोषण आहार योजनेत अध्यक्षांच्या परस्पर आर्थिक अफरातफर केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवती येथे कार्यरत असणारे मुख्याध्यापक विश्वनाथ तुकाराम भाग्यवंत यांना निलंबित करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कोरोना कालावधीमध्ये नियमबाह्य पद्धतीने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवड करून शालेय पोषण आहार योजनेमध्ये आर्थिक अपहार केल्यामुळे त्यांना दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी निलंबित करण्यात आले. येवती गावामधील गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच सदस्य यांना अरेरावीची भाषा करून परस्पर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बदलून शालेय पोषण आहारातील पैसे काढून आर्थिक अपहार केलेला होता.

याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान सोपान खुर्द यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापकांची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये मुख्याध्यापक दोषी आढळून आल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news