Pandharpur News : विठ्ठल मंदिरात पैसे घेऊन दर्शन देणं भाोवलं

दर्शनासाठी शुल्क घेणार्‍यावर गुन्हा; दोन सुरक्षा रक्षक निलंबित
Pandharpur Vitthal Temple
पंढरपूर तीर्थक्षेत्र विठ्ठल मंदिर
Published on
Updated on

पंढरपूर : ठाणे येथून आलेल्या भाविकाला श्री विठ्ठल- रुक्मिणीचे (Vitthal Rukmini temple) जलद दर्शन घडविण्यासाठी पैसे घेतले, मात्र पावती दिली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या भाविकाने पंढरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानुसार सुमीत शिंदे या खासगी एजंटावर गुन्हा दाखल झाला आहे; तर त्याला साथ देणार्‍या दोन सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Pandharpur Vitthal Temple
वाळूज महानगरातील छोटे पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमले

रविवार, दि. 18 ऑगस्ट रोजी चेतन रविकांत काबाडे (रा. ठाणे) हे श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनास पंढरपूरला (Pandharpur Vitthal Temple) आले होते. गर्दी खूप असल्याने दर्शनासाठी पास मिळतो का, याची चौकशी करत असताना फूल विक्रेता दर्शन घडवून आणत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा काबाडे व त्या फुल विक्रेत्यामध्ये चार हजार रुपयाला दर्शन घडवून आणायचे व पावती द्यायची, असे ठरले. त्या व्यक्तीच्या मोबाईलवर ऑनलाईनवर चार हजार रुपये पेमेंट केले. सुमीत संभाजी शिंदे या व्यक्तीच्या नावावर पेमेंट जमा झाल्याचे दिसून आले.

त्या व्यक्तीने संबंधित भाविकाकडून 4 हजार रुपये ऑनलाईन पेमेंट करून घेतले व संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपातून दर्शनास सोडले. दर्शन झाल्यानंतर भाविक बाहेर आले व पेमेंट केल्याची पावती मागणीसाठी शिंदे याला शोधू लागले; मात्र तो मिळून आला नाही. पावती न मिळाल्याने भाविकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात अले. यानंतर, त्यांनी रीतसर तक्रार नोंदवली. पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे सुमीत शिंदे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच दर्शन मंडप गेटवरील रक्षक सिक्युरिटी कंपनीचे कर्मचारी अभिजित रघुनाथ मंडळे, शुभम शामराव मेटकरी या दोन्ही कंत्राटी कर्मचार्‍यांनी विनापरवाना दर्शनास सोडल्याने त्यांना निलंबित केले.

Pandharpur Vitthal Temple
Ashadhi Ekadashi : आषाढी विशेष; 'अवघे गर्जे पंढरपूर...',पाहा फोटो
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या (Pandharpur Vitthal Temple) दर्शनासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमार्फत कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दर्शन हे संपूर्णत: नि:शुल्क आहे. त्यामुळे भाविकांना मंदिर समितीच्या वतीने आवाहन करण्यात येते की, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांनी कोणाबरोबरही आर्थिक व्यवहार करू नये.
राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news