वाळूज महानगरातील छोटे पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमले

पालकमंत्री तथा खासदार संदीपान भुमरेंच्या हस्ते महाभिषेक व आरती संपन्न
Crowd of devotees in small Pandharpur in Waluj Mahanagar
वाळूज महानगरातील छोटे पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमलेPudhari Photo
Published on
Updated on

वाळूज महानगर : पुढारी वृत्तसेवा

आषाढी एकादशी निमित्त खांद्यावर पताका, टाळ-मृदूंगाचा गजर तसेच हरिनामाचा जयघोष करीत लाखो भाविकांनी आज (बुधवार) सकाळी वाळूज महानगरातील प्रती पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. सकाळपासूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह पंचक्रोशीतील वारकरी दिंड्या व भाविकांचे जत्थे पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी येतांना दिसून आले. यामुळे मंदिररात दर्शनासाठी भाविकांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.

Crowd of devotees in small Pandharpur in Waluj Mahanagar
Ladka Bhau Yojana | आता लाडक्या भावांसाठी योजना, दरमहा १० हजार मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

तसेच पंढरपूर ते नगर नाका, पंढरपूर ते वाळूज व औद्योगिक क्षेत्रातील बजाजनगर, रांजणगाव, सिडको वाळूज महानगरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. भाविकांच्या मुखी विठ्ठल नामाच्या गजराने वातावरणात नवचैतन्य पसरले होते. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत ३० दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त छोट्या पंढरपुरात दरवर्षी मोठी यात्रा भरते. या यात्रेत जवळपास ८ ते १० लाख भाविक दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात.

Crowd of devotees in small Pandharpur in Waluj Mahanagar
Aaditya Thackeray | आता विधानसभा निवडणुकीतही गद्दारांना धडा शिकवायचा

मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात पालकमंत्री तथा खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते महाभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी संस्थाने अध्यक्ष राजेंद्र पवार, अप्पासाहेब झळके, पाटोदा येथील उपसरपंच कपींद्र पेरे, महेंद्र खोतकर, गणेश नवले, संजय झळके, मछिंद्र झळके, नितीन साबळे, विष्णू झळके, हरीश साबळे आदींची उपस्थिती होती.

Crowd of devotees in small Pandharpur in Waluj Mahanagar
Hiraman Khoskar | होय, मागच्या वेळी चूक झाली ; आ. खोसकर यांची कबुली

त्यानंतर बुधवारी पहाटे ५ वाजता एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे व त्यांच्या हस्ते सपत्नीक पाद्यपूजा करण्यात आली. दरम्यान मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेवून पोलीस प्रशासनातर्फे मंदिर परिसरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news