

सोलापूर ः सोलापुरात संघटीत गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले.
पहिल्या टोळीचा प्रमुख मनोज राम गायकवाड (वय 45), रितेश मनोज गायकवाड (वय 25), योगेश चंद्रकांत कोळेकर (वय 25) आनंद राम गायकवाड (वय 45) सर्व रा. धाकटा राजवाडा, कोंतम चौक यांच्या विरोधात 2015 ते 2025 दरम्यान टोळीच्या माध्यमातून दंगा करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरोधात जोडभावी पोलीसांनी पोलीस उपायुक्तांकडे तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
दुसऱ्या टोळीचा प्रमुख राम शशिकांत तळभंडारे (वय 29), विजय कामेश वाघमारे (वय 30) आणि शिवाजी मारुती तळभंडारे (वय 42) सर्व रा.धाकटा राजवाडा, कोंतम चौक ) यांच्या विरोधात 2018 ते 25 दरम्यान टोळीच्या माध्यमातून दंगा करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरोधात जोडभावी पोलीसांनी तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्तांकडे पाठविण्यात आला होता. या दोन्ही प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दोन्ही टोळीतील सात जणांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार केले. सहा महिन्यापूर्वी गायकवाड व तळभंडारे यांच्यामध्ये कोंतम चौक येथे मोठी हाणामारी झाली होती. दरम्यान त्याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यातील एका भाईला या अगोदरच एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता पोलीसांनी मोठी कारवाई करीत दोन्ही टोळीतील सुमारे सात जणांना तडीपार केले आहे.