सोलापूर एसटी स्थानक बनले चोरांचे आगार; एसटी स्थानकात प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर, कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणाच नाही

सोलापूर एसटी स्थानक बनले चोरांचे आगार; एसटी स्थानकात प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर, कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणाच नाही
Published on
Updated on

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : सोलापूर एसटी स्थानकात गेल्या काही दिवसांपासून चो-यांचे प्रमाण वाढत आहे. एसटीमध्ये चढताना अथवा उतरताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांचे मौल्यवान वस्तूसह दाग-दागिन्यांवर डल्ला मारत आहेत. एसटी स्थानकात कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक अथवा पोलिस कर्मचारी तैनात नसल्याने स्थानक परिसरात चाेरांचा वावर वाढला आहे.

सलग सुट्या व अधिकमासाचे औचित्य साधून नागरीक देवदर्शन, पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. तसेच राज्य शासनाच्या महिला सन्मान योजनेमुळे महिलांचा वर्ग एसटीला प्राधान्य देत आहेत. याचाच फायदा घेत चोरटे स्थानक परिसरात पाळत ठेऊन चोऱ्या करत आहे. स्थानकात एसटी येताच चोरट्यांचा एक गट एसटीच्या दरवाजा जवळ गर्दी करून उभे राहतात. तर यामध्ये महिला चोरट्यांचे प्रमाण अधिक असल्याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

दरम्‍यान, एसटीत चढताना प्रत्येक प्रवासी बसण्यासाठी जागा मिळवण्याची धडपड करत असतो. याच गर्दीत चोरटे धक्काबुक्की करत वादविवाद करत प्रवाशांशी हुज्जत घालत त्या प्रवाशाचे लक्ष विचलित करतात. या सगळ्या गोंधळात दुसरा चोरटा सफाईदार पणे प्रवाशांच्या गळ्यातील मौल्यवान दागिने, बॅगा, मोबाईल चोरून पळ काढतात. ज्यावेळी प्रवाशांना लक्षात येते आपले मौल्यवान वस्तू चोरीला गेले आहे. तो पर्यंत एसटी स्थानकातून निघून गेलेली असते. अशा प्रसंगी प्रवासी एसटीच्या चालक- वाहकांना झालेल्या घटनेची माहिती सांगितले तरी ताचा विशेष काही उपयोग होत नाही. तर दुसरीकडे पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यासाठी चोरीला गेलेल्या मुद्देमालाची पावती दाखवाला सांगितले जाते. त्यामुळे परगावातून आलेले प्रवासी चोरीची तक्रार न करताच निघून जातात. यामुळे चोरांची रोजच चांदी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

एसटी स्थानकात प्रवाशांना मौल्यवान साहित्य बाळगताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. स्थानक परिसरात पोलिसांसाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहे. परंतु, याठिकाणी पोलिस कर्मचारी ठराविक वेळेपर्यंत कार्यरत असतात. एसटी स्थानकात कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी तैनात करण्यासाठी पोलिस प्रशासनाला पत्र देणार आहे.
– विनोदकुमार भालेराव, विभाग नियंत्रक

प्रवाशांची संख्या लक्षात घेता एसटी स्थानकात पुरेशी सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. स्थानकात सीसीटिव्ही कॅमेर्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. तसेच कायमस्वरूपी पोलिस व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावे. चोरी झाल्यास तत्काळ तक्रार दाखल करून घ्यावे.
– राजाभाऊ जाधव, प्रवासी संघटना 

.हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news