सोलापूर : सिंहगड कॉलेजमध्ये सराईत गुन्हेगाराचा साथीदारांसह धुडगूस

शिपायावर चाकूहल्ला; सहा- सात जणांना मारहाण
Sinhgad College incident
सिंहगड कॉलेजमध्ये सराईत गुन्हेगाराचा धुडगूस
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावरील सिंहगड कॉलेजात सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह धुडगूस घालत कॉलेजच्या शिपायावर चाकूहल्ला केला. तसेच इतर सहा ते सात जणांना विटा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.२७) दुपारी चारच्या सुमारास घडली. जखमींवर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी नऊ जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Sinhgad College incident
सोलापूर : धनगर समाजाचे रास्ता रोको आंदोलन

दरम्यान, सिंहगड कॉलेजचे प्रशासन हे रात्री उशिरापर्यंत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. प्रकाश दत्तू माळी (वय 35, रा. सिंहगड कॉलेज कॉटेज, नवीन पूना नाका, केगाव, ता. उत्तर सोलापूर) असे जखमी शिपायाचे नाव आहे. तर कॉलेजचे दत्तात्रय ईश्वर नवले (रा. सिंहगड कॉलेज) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अमोघ कुलकर्णी, दीपक गरड, रोहित वाडेकर, रोहित मंडलिक, गणेश कोडे, शुभम भोईट, संजय उफाडे, श्रीकांत वाघमोडे, अरमान शेख (सर्व रा. बाळे) यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sinhgad College incident
सोलापूर : मळणीयंत्रात साडी अडकून शेतमजूर महिला ठार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news