सोलापूर : मळणीयंत्रात साडी अडकून शेतमजूर महिला ठार

मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील घटना
thresher machine accident
मळणीयंत्रात साडी अडकून शेतमजूर महिला ठार झाली.
Published on
Updated on

पोखरापूर : शेतात मुगाची रास करत असताना मळणीयंत्रात साडी अडकून डोक्यावर जोरात आदळल्याने शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरूवारी (दि.२०) सायंकाळी पाचच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो. येथे घडली. भामाबाई महादेव कोळेकर असे मृत महिलेचे नाव आहे.

thresher machine accident
Nashik Accident | बँड पथकाच्या वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण जागीच ठार

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव कोळेकर हे पत्नी भामाबाई, मुलगा व सून असे मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे राहत असून मोलमजुरी करून पोट भरतात. गुरूवारी मोरवंची येथील रामा कोळेकर यांच्या शेतामध्ये मुगाची रास करण्यासाठी मजुरीने इतर महिलांसह भामाबाई कोळेकर गेल्या होत्या. दरम्यान ५ वाजण्याच्या सुमारास त्या मुगाची गढूडे उचलून मशीनमध्ये टाकत असताना मळणी मशीन फिरवणाऱ्या ट्रॅक्टरच्या जॉईन्टमध्ये व मळणी मशीनच्या यंत्रामध्ये साडी अडकली व त्यामुळे पाय अडकुन त्या जोरात डोक्यावर आपटल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. त्यावेळी त्यांना इतर महिला शेतमजूरांच्या मदतीने मोहोळ ग्रामीण रूग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चंद्रकांत ज्ञानदेव कोळेकर यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

thresher machine accident
कीर्तनाला जात असताना भक्तांवर काळाचा घाला; ३ जागीच ठार, ४ जखमी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news