Solapur Accident | राँग साईडने आलेल्या कंटेनरची दुचाकीला धडक; गर्भवती पत्नीसह पतीचा जागीच मृत्यू

सांगोला-जत मार्गावरील कडलास गावाजवळ अपघात
 Sangola Jat Road Container Hits Bike
Sangola Jat Road Container Hits BikePudhari
Published on
Updated on

Sangola Jat Road Container Hits Bike

सांगोला : सांगोला-जत मार्गावरील कडलास गावाजवळ शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. राँग साईडने भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. मृतांमध्ये सागर भारत जाधव (वय २७) आणि त्यांची पत्नी सुजाता सागर जाधव (वय २४, रा. वाकी शिवणे, ता. सांगोला) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २७) दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास इंदापूर-विजापूर राज्य महामार्गावरील गायकवाड वस्ती बसस्टॉपजवळ, कडलास गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. कंटेनर (क्रमांक MH 05 CY 1339) भरधाव वेगाने राँग साईडने येत असताना समोरून येणाऱ्या स्प्लेंडर मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि सागर जाधव व त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

 Sangola Jat Road Container Hits Bike
Pune Solapur Road Redevelopment: पुणे-सोलापूर रस्ता व शिवरकर रोड विकास प्रकल्पाला गती

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दुर्घटनेची माहिती नातेवाईक अमोल नानासो जाधव यांनी पोलिसांना दिली.

या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून कंटेनर चालक प्रकाश बिरा खरात (रा. सोनलवाडी, ता. सांगोला) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भातुंगडे करीत आहेत.

 Sangola Jat Road Container Hits Bike
Solapur Municipal Corporation: महापालिकेच्या नव्या ई-बस ९ आणि १२ मीटर लांबीच्या

तपासणीसाठी जात असतानाच काळाचा घाला

सागर जाधव हे मूळचे वाकी शिवणे (ता. सांगोला) येथील रहिवासी असून ते जेसीबी चालक म्हणून काम करत होते. विवाहानंतर ते कडलास येथे वास्तव्यास होते. त्यांची पत्नी सुजाता या गर्भवती असल्याने दोघेही सांगोला येथील रुग्णालयात नियमित तपासणीसाठी मोटारसायकलवरून जात होते. मात्र, मार्गातच झालेल्या भीषण अपघाताने त्यांच्या संसारावर काळाने घाला घातला.

या हृदयद्रावक घटनेमुळे वाकी शिवणे, कडलास आणि परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक व ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news