सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची बदली: एम राजकुमार नवे पोलीस आयुक्त

सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची बदली: एम राजकुमार नवे पोलीस आयुक्त
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची बदली नाशिक येथे झाली आहे. त्यांच्या जागी सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची नियुक्ती झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 42 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा सिलसिला चालू राहिला आहे.
या बदल्यांमध्ये सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची बदली झाली असून त्यांना सहसंचालक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी नियुक्ती देण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना पदोन्नतीने सोलापूरच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती मिळाली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news