सोलापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात फुलांची तिरंगा आरास (फाेटाे)

विठ्ठल मंदिरात फुलांची तिरंगा आरास
विठ्ठल मंदिरात फुलांची तिरंगा आरास

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा आज २६ जानेवारी प्रजासत्‍ताक दिनानिमित्‍त श्री संत तुकाराम भवन व श्री विठ्ठल-रूक्मिणी भक्तनिवास येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम, श्री. विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात फुलांची आरास, विद्युत रोषणाई व श्रींना पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले. याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

श्री संत तुकाराम भवन व श्री विठ्ठल-रूक्मिणी भक्तनिवास येथे अनुक्रमे मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे व .ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर) यांनी राष्ट्रध्वजारोहण केले. यावेळी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार व बलभिम पावले तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात तिरंगा रंगाची फुलांची आकर्षक आरास/सजावट करण्यात आली आहे. दानशूर भाविक श्री.सचिन चव्हाण, पुणे यांनी ही मोफत सेवा दिली असून, याकामी 1.5 ते 2 टन झेंडू व शेवंती फुलांचा वापर करण्यात आला आहे. तसेच श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर, नामदेव पायरी, श्री.विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास व दर्शनमंडपावर आकर्षक नयनरम्य अशी तिरंगा रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

श्री.संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये आजच्या भोजनप्रसादात गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला असून, श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेस दुपारी पारंपारिक पोषाखावेळी अलंकार परिधान करण्यात येणार आहेत.

विठ्ठल चरणी 50 लक्ष किंमतीचे गुप्तदान; भाविकांकडून सोन्याची घोंगडी दान

आज दिनांक 26 जानेवारी, 2024 रोजी दानशुर भाविकाकाडून श्री.विठ्ठल चरणी 50 लक्ष किंमतीच्या सोन्याच्या घोंगडीचे गुप्तदान करण्यात आले. याची माहिती व्यवस्थाक श्री.बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे. सदर सोने वस्तू 820 ग्रॅमची असून, त्याची अंदाजे किंमत 49.57 लक्ष होत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news