Ashadhi Wari | श्री संत गजानन महाराज पालखीचे मोहोळ तालुक्यात आगमन; माचनूरमध्ये आज मुक्काम

हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ग्रामस्थ, वारकरी व भाविकांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत
Sant Gajanan Maharaj Palkhi Mohol
हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ग्रामस्थ, वारकरी व भाविकांकडून पालखीचे जल्लोषात स्वागतPudhari
Published on
Updated on

Sant Gajanan Maharaj Palkhi Mohol

कामती : श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी (दि.२१) पहाटे साडेपाचच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील शिंगोली येथे आगमन झाले. हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ग्रामस्थ, वारकरी व भाविकांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले.

त्यानंतर पालखी कामती, बेगमपूर, वाघोली मार्गे मंगळवेढा तालुक्यातील माचनूरकडे मार्गस्थ झाली. संपूर्ण मार्गावर वारकऱ्यांसाठी चहा, पोहे, बिस्किटे व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. वाघोली ग्रामस्थांनी रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करत पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

Sant Gajanan Maharaj Palkhi Mohol
Ashadhi Wari : टाळ मृदुंग संगे गेले रिंगण रंगोनी

पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन कामती पोलीस ठाण्याने संपूर्ण मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन करण्यात आल्याने पालखी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहिली आणि वारकऱ्यांना कोणताही अडथळा न येता पालखी सुरक्षितपणे पुढे मार्गस्थ झाली.

श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे होते. कामती पोलीस ठाणे आणि NHAI यांच्या समन्वयातून वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे हाताळण्यात आली.

— बसवेश्वर जाकीकोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कामती पोलीस ठाणे

वाघोली गावात गेल्या अनेक वर्षांपासून संत गजानन महाराजांच्या पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाते. यंदाही ग्रामस्थांनी भक्तिभावाने पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांची सेवा केली.

— विकास वाघमारे, भाजप जिल्हा सरचिटणीस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news