Solapur news | बसस्थानकात स्वच्छतागृहाच्या वापरासाठीही पैसे घेणे सुरूच

1 जून या महामंडळाच्या वर्धापन दिनापासून स्वच्छतागृहाचा वापर हा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचे महामंडळाने जाहीर केले होते
MSRTC free toilet service from June 1
MSRTC free toilet service from June 1
Published on
Updated on

आमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर : परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने गेल्या १५ एप्रिलपासून प्रवाशांच्या तिकिटावर दोन रुपये स्वच्छता अधिभार लावला. या बदल्यात बसस्थानकातील स्वच्छतागृह वापर पूर्णपणे मोफत उपलब्ध असणार असल्याचे महामंडळाकडून जाहीर केले. मात्र स्वच्छतागृह वापरासाठी प्रवाशांना आजही पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे प्रवाशांना स्वच्छतागृह वापरासाठी अधिभारासह स्वच्छतागृहाच्या वापरासाठी दोन वेळा पैसे द्यावे लागत असल्याने यांना दुहेरी आर्थिक फटका बसत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येक सामान्य प्रवाशांकडून १५ एप्रिलपासून स्वच्छता अधिभार म्हणून अतिरिक्त दोन रुपये घेतले जात आहेत. पंधरा दिवस अगोदरच प्रवासी स्वच्छता अधिभाराचे पैसे मोजत आहेत. सेवा देण्यापूर्वीच महामंडळाने हा अधिभार लागू केला. स्वच्छता अधिभार देऊनही प्रवाशांना येथील मध्यवर्ती बसस्थानकात स्वच्छतागृहाच्या वापरासाठी पैसे मोजावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

MSRTC free toilet service from June 1
Iran war impact: गरज राष्ट्रभान जागृतीची

एक जून या महामंडळाच्या वर्धापन दिनापासून स्वच्छतागृहाचा वापर हा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचे महामंडळाने जाहीर केले होते. मात्र येथील मध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छतागृहाच्या वापरासाठी आजही प्रवाशांना पैसे द्यावे लागत आहेत. या प्रवाशांना बसमध्ये बसून तिकीट काढताच या स्वच्छतागृहासाठी दोन रुपयांचा अधिभार द्यावा लागतो आणि प्रत्यक्षात स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठीदेखील पुन्हा पैसे द्यावे लागत असल्याने येथील प्रवाशांना दुबार आर्थिक फटका बसतो. यामुळे प्रवासी परिवहन महामंडळाच्या कारभाराविषयी उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत.

MSRTC free toilet service from June 1
Mission Katakasar | मिशन काटकसर

स्वच्छतागृह चालवण्याचा ठेका प्रशासनाने स्थगित केला होता. मात्र, संबंधित ठेकेदार या स्थगितीच्या विरोधात न्यायालयात गेल्याने, ही बाब न्यायप्रविष्ट बनली.पूर्वीच्याच ठेकेदाराने प्रवाशांकडून पैसे घेऊनच स्वच्छतागृहाचा वापर करू दिला जात आहे. प्रशासन यावर लवकरच तोडगा काढेल, प्रवाशांना मोफत सेवा देण्याचा प्रयत्न करेल.

- अमोल गोंजारी, विभागीय व्यवस्थापक, परिवहन महामंडळ, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news