Solapur Mohol house burglary gold stolen|मोहोळमध्ये भरदिवसा घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Gold and silver ornaments were stolen in a brazen daylight house burglary in Mohol.- दोन घरांना चोरट्यांचा लक्ष्य; १ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला
theft
theftPudhari
Published on: 
Updated on: 

मोहोळ शहर:मोहोळ शहरातील समर्थ नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा दोन घरे फोटून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेत सोन्याची चैन, सोन्याचे गंठण आणि चांदीच्या पैंजणांसह एकूण १ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किशोर वासुदेव दाते (वय ४८, रा. गणेशनगर, कुरुल रोड, मोहोळ) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवार सकाळी १० ते दुपारी ३.१५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, अंदाजे ५० हजार रुपये किमतीची, तसेच १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे, असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याच कालावधीत समर्थ नगर, मोहोळ येथील मुकेश रामचंद्र बारबोले यांच्या राहत्या घराचेही कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या घरातून अंदाजे दोन हजार रुपये किमतीचे दोन भार वजनाचे चांदीचे पैंजण आणि ५ हजार रुपये किमतीचे पाच भार वजनाचे चांदीचे पैंजण, असे एकूण सात हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले.

दिवसा घरांना कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी ही चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३) व ३०५(अ) अन्वये गुन्हा क्रमांक १०१९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

theft
Congress Protest in Delhi : काँग्रेसचे दिल्‍लीत रविवारी आंदोलन

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटील करीत आहेत. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे नागरिकांनी घराबाहेर जाताना सुरक्षिततेची खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

theft
Satara News : वन्यजीवांसाठी उभारले ४०० वनराई बंधारे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news