सोलापूर: पुढारी वृत्तसंस्था : बँकेवर दरोडा टाकण्याकरीता निघालेली आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद करण्यात आली आहे. गॅस कटरच्या सहाय्याने बँक, ज्वेलर्स शॉप, फोडणारे सराईत 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत (दि.१६) पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे. (Solapur Crime News)
अटक केलेल्या आरोपींकडून एकूण ६ लाख ४२ हजार ७७० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. माळशिरस येथील जिल्हा मध्यवर्ती बँक, सदाशिवनगर, माळशिरस याबँकेची भिंत फोडून गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे लॉकर तोडून ५१ लाख १६ हजार ४४७ रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Solapur Crime News)
स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथके तयार करून त्यांनी गुन्हयातील आरोपींची माहिती प्राप्त केली. गॅस कटरच्या सहाय्याने भिंत फोडून बँकेत चोरी करण्याची पध्दत झारखंड येथील आरोपी ठिकठिकाणी वापरतात. असे तपासात लक्षात आले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने झारखंड राज्यातील साहेबगंज व पश्चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्हयातून 2 आरोपींना ताब्यात घेतले होते. उर्वरित आरोपी हे नेपाळ, बांगलादेशमध्ये पळून गेले होते.
मंगळवारी (दि.१०) स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे यांना गोपनीय बातमी मिळाली की, झारखंड व नेपाळ येथील आरोपी हे लातूर येथील बँकेवर दरोडा टाकण्याकरीता येणार आहेत. त्यानंतर सोलापूर तुळजापूर महामार्गावरील मौजे उळे गावच्या हद्दीत सापळा रचून अत्यंत शिताफीने दरोड्याच्या तयारीतील ५ आरोपींना दरोडयाच्या साहित्य व वाहनासह ताब्यात घेतले. या गुन्हयात इतर ०८ आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
३ आरोपींना पुणे येथून ताब्यात घेतले. तर उदगीर लातुर येथून ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्हयातील, पश्चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्हयातील तसेच नेपाळ या देशातील आहेत. यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी देशाच्या विविध भागात गॅस कटरच्या सहाय्याने बॅक फोडीसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. या आरोपीविरोधात माळशिरस पोलीस ठाणे, वाकड पोलीस ठाणे (पिंपरी- चिंचवड), सुजातानगर पोलीस ठाण्याता गुन्हे दाखल आहेत.
आरोपीकडून दरोडा टाकण्यासाठी व बँक फोडण्यासाठी लागणारे मोठे गॅस सिलेंडर, गॅस कटर, मोठे स्कु ड्रायव्हर, कटावण्या, लोखंडी कानस, हातोडे, लोखंडी पहार, दोरी, कोयते इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
Solapur Crime News : अटक आरोपींची नावे
१) इनामुल उर्फ मिथुन कुशाबोर शेख (वय ३८, रा. पैगम टोला, पियारपुर, थाना- राधानगर, जि. साहेबगंज, राज्य झारखंड)
२) मुसलिम शेख हाफीजुल शेख (वय २७, रा. हरमल्ली थाना- राजमहल, पोस्ट जामनगर, जि. साहेबगंज, राज्य झारखंड)
३) सुरज आलम नजीरउलहक (वय ३३, रा. सुस्तानी बांदापुखुर पोस्ट- मालदा, राज्य पश्चिम बंगाल)
४) राज बहादुर कामी चंद्र बहादुर कामी (चालक), (वय ३२)
५) दीपक बहादुर डिल्ली दमाई (वय ३५, दोघे रा. कोलमुडा, थाना-गोदावरी जिल्हा कैलाली, नेपाळ, सध्या रा. अंबाली, अंधेरी वेस्ट, मुंबई)
६) मो. कमरूद्दीन उर्फ कमरू मो. आसु शेख, (वय ३६, रा. तापुतोला दियारा, पोस्ट पलसगच्छी, जि. साहेबगंज, राज्य झारखंड)
७) एनजामुल हक सनाउल्ला शेख, (वय २८, रा. माणिकपाडा, पोस्ट गगन पहाडी, थना पाकुड, राज्य झारखंड)
८) मो. कमलुद्दीन सहाजुल, (वय ३७, रा. औरंगाबाद थाना, सुती, जि. मुर्सीदाबाद, राज्य पश्चिमबंगाल)
९) सिबासिंग देओल गुमानसिंग देओल, (वय ४०, रा. सिलगडी, पोस्ट डोटी, थाना, जिल्हा डोटी, देश नेपाळ)
१०) भिम विश्वकर्मा मान विश्वकर्मा, (वय ३३, रा. स्वारकटान, थाना अत्तरिया, जि. कैलाली, देश नेपाळ)
११) टिकाराम गौरव कोली, (वय २९, रा. नारीकोला, थाना सिलगडी, जि. डोटी, देश नेपाळ )
१२) दीप विक्रमसिंग नेगी भानसिंग नेगी (वय ४४, रा. मालुबेला थाना, गुलरिया, जि. कंचनपुर देश नेपाळ)
१३) भरतसाऊद हर्कसाऊद, (वय ४२, रा. गुलरिया, थाना व पोस्ट गुलरिया जि. कंचनपूर, देश नेपाळ)
ही कामगिरी शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि धनंजय पोरे, शशिकांत शेळके, पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सुबोध जमदाडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, शिवानी घोळवे, मनोहर माने, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, पोलीस हवालदार, बापू शिंदे, आबा मुंडे, धनाजी गाडे, प्रकाश कारटकर, सलिम बागवान, मोहन मनसावाले, विजय भरले, रवि माने, धनराज गायकवाड, चालक समीर शेख, अजय वाघमारे, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, दिलीप थोरात, युसुफ पठाण, अन्वर अत्तार, समर्थ गाजरे, सुरज रामगुडे, विनायक घोरपडे यांनी केली.
हेही वाचा