Solapur Bike theft|आंतरजिल्हा मोटारसायकल चोर जेरबंद; सखोल चौकशीत कबुली, १४ दुचाकींसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर | आंतरजिल्हा मोटारसायकल चोर जेरबंद; १४ दुचाकींसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

सोलापूर शहर गुन्हे शाखेला आंतरजिल्हा मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात मोठे यश मिळाले आहे. सोलापूरसह इतर जिल्हे आणि कर्नाटक राज्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केलीय. त्याच्याकडून तब्बल १४ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

या मोटारसायकलींची एकूण किंमत सुमारे साडेसहा लाख रुपये असून या कारवाईमुळे १४ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा तपास सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

Arrested
Solapur Bribery Case : लाचखोर मंडल अधिकारी जाळ्यात

त्याच्याकडील होंडा युनिकॉर्न ही मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सखोल चौकशीत त्याने आणखी १३ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून सर्व १४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

Arrested
Train Robbery|यशवंतपूर रेल्वे दरोड्याबाबत अद्याप धागेदोरे नाहीच

सोलापूरसह इतर जिल्हे आणि कर्नाटकातील चोरीचे गुन्हेही उघडकीस आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news