Solapur Bribery Case : लाचखोर मंडल अधिकारी जाळ्यात

मुरूम उपसा अहवाल देण्यासाठी मागितले एक लाख
Bribery Case
Bribery Case (File Photo)
Published on
Updated on

सोलापूर : विहिरीतील मुरूम उपसा करण्यासाठी स्‍थळ पाहणी करून सकारात्‍मक अहवाल देण्यासाठी तब्‍बल एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्‍यातील तिऱ्हे येथील मंडल अधिकारी विजयकुमार माने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्‍याच्‍यावर सलगर वस्‍ती पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हा शेतीसोबत मुरूम उपशाचे काम करतो. विहीर खोदाईतून निघालेल्या मुरुमाची वाहतूक करण्यासाठी त्याने उत्तर सोलापूर तहसीलदारांकडे रितसर अर्ज केला होता. त्‍यानंतर तहसीलदारांनी तिऱ्हे मंडल अधिकारी विजयकुमार माने यांना स्‍थळ पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना केल्या. त्‍यानंतर तक्रारदाराने माने यांच्‍याशी संपर्क साधल्यानंतर स्थळ पाहणी करून सकारात्मक अहवाल देण्यासाठी माने याने एक लाख रुपयांची मागणी केली. दरम्‍यान, माने याने लाचेची मागणी करूनही लाच स्वीकारली नव्‍हती. याचा संशय आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माने याने लाच मागितल्याबाबत तपास केला.

माने याच्‍या बेकायदेशीर कामाचा दै. ‘पुढारी’ने केला होता पर्दाफाश

तिऱ्हे येथील मंडल अधिकारी विजयकुमार माने याने राज्‍यातील वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्‍या नातेवाईकांकडे सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी पैशाची मागणी केली होती. पैसे न मिळाल्याने त्‍याने बेकायदेशीपणे नोंद फेटाळली. याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी माने याच्‍यावर ठपका ठेवत सातबाऱ्यावर नोंदीचे आदेश दिले. याचा पर्दाफाश दै. ‘पुढारी’ने केला होता. याच बरोबर विजयकुमार माने याची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस प्रांताधिकाऱ्यांनी केली आहे; परंतु दोन्‍ही प्रकरणांत माने याची चौकशी संथपणे सुरू आहे. तशात आता एसीबीने त्‍याला पकडल्याने महसूल प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news