Train Robbery|यशवंतपूर रेल्वे दरोड्याबाबत अद्याप धागेदोरे नाहीच

सोलापूर, कर्नाटक व रेल्वे पोलिस दलाची झाली बैठक
Trains
TrainsPudhari
Published on
Updated on

सोलापूर : तडवळ (ता. अक्कलकोट) येथील रेल्वे स्टेशनवर थांबवलेल्या यशवंतपूर बिकानेर या गाडीवर टाकलेल्या दरोड्याबाबत अद्याप लोहमार्ग, रेल्वे पोलिस दल व कर्नाटक पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोर हाती लागले नाहीत. या घटनेबाबत लोहमार्ग पोलिस, कर्नाटक व रेल्वे पोलिस दल या तीनही पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यापूर्वी रेल्वेवर दरोडा टाकलेल्या गुन्हेगारांची कसून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आले. शिवाय, यशवंपूर बिकानेर व साईनगर शिर्डी या दोन्ही गाड्या यापुढे तडवळला न थांबवता त्या गाड्या विजापूरसारख्या मोठ्या स्टेशनवरच थांबवण्याविषयीही यावेळी चर्चा झाली.

शनिवारी पहाटे यशवंतपूर बिकानेर या एक्सप्रेसवर पाच ते सहा जणांच्या टोळीकडून दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात प्रवाशांचा लाखो रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. सोमवार रोजी लोहमार्ग, कर्नाटक आणि रेल्वे पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोलापूरातील रेल्वे पोलिस दलाच्या कार्यालयात बैठक झाली. याबैठकीत तीन ते चार नावे समोर आली आहेत. याशिवाय, दावणगेरी, निंबाळ येथील स्टेशनवर यापूर्वी ज्या आरोपींनी दरोडा टाकला होता. त्यांच्यासह महाराष्ट्रातील मिरज व पारेवाडी आदी ठिकाणावरील यादीतील आरोपींची कसून चौकशी करण्याचेही यावेळी ठरले.

तडवळ स्टेशनवर यशवंतपूर बिकानेर ही एक्सप्रेस गाडी थांबवली जाते. शिवाय, तेही स्टेशनपासून काही अंतरावर आडरानात. यामुळे गाडीत कोण चढले किवा गाडीतून कोण उतरले हे कळत नाही. अशावेळी २२ कोचच्या गाडीसाठी गाडीत किमान ४ रेल्वेचे सुरक्षा दलाचे कर्मचारी व खाली तीन ते चार पोलिस कर्मचारी असणे आवश्यक आहे.
शब्बीर तांबोळी, पोलिस उपनिरीक्षक लोहमार्ग पोलिस सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news