Solapur | बँकांच्या संपाचा 'बीएएमएस' प्रवेश प्रक्रियेवर परिणाम, प्रवेशासाठी डीडी आवश्यकच, पण बँका सलग ४ दिवस बंद

Solapur | बँकांच्या संपाचा 'बीएएमएस' प्रवेश प्रक्रियेवर परिणाम, प्रवेशासाठी डीडी आवश्यकच, पण बँका सलग ४ दिवस बंद
Solapur news
सलग ४ दिवस बँका बंद राहणार असून त्याचा परिणाम 'बीएएमएस' प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे
Published on: 
Updated on: 

उत्तर सोलापूर : सध्या महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी) च्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ग्रुप 'बी'मध्ये बीएएमएस, बीएचएमएस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात हजर राहून प्रवेश घ्यावा लागणार आहे. याच दरम्यान देशभर राष्ट्रीयकृत बँकांचा संप असल्याने चार दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बँकेतून महाविद्यालयाच्या प्रवेश शुल्काचा डीडी काढणे अशक्य होणार असल्याने याचा थेट परिणाम वैद्यकीय प्रवेशावर होणार आहे.

राज्यात सीईटी सेलच्या वतीने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. जसे की अभियांत्रिकी, वैद्यकीय, नर्सिंग यासारख्या प्रवेशांचा समावेश आहे. सीईटी सेलच्यावतीने ही प्रक्रिया गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. याचदरम्यान बीएएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे.

या वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांनी 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहून प्रवेश घेण्यास सांगितले आहे. हा प्रवेश घेताना संबंधित महाविद्यालयाचे जे शुल्क आहे ते शुल्क डिमांड ड्राफ्ट अर्थात डीडीच्या स्वरूपात देणे बंधनकारक केले आहे. पण, याच काळामध्ये म्हणजेच 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत बँका बंद आहेत.

26 सप्टेंबरला शनिवार असल्याने बँका बंद राहतील. त्यामुळे संप आणि सुट्ट्या मिळून सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. बँका बंद असल्याने डीडी काढायचा कसा? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. डीडी न काढल्याने संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश आपोआप रद्द होणार आहेत. ज्या दिवशी प्रवेश घेणार आहे, त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल तर मात्र त्या विद्यार्थ्यांकडून धनादेश स्वीकारला जाणार आहे. पण त्याच्या पुढच्या कामकाजाच्या दिवशी संबंधित विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, त्या महाविद्यालयात डीडी देऊन धनादेश परत घेण्याची अट घातली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून संप पुकारण्यात आल्याने डीडी काढायचा कसा? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.

... तर प्रवेश घेणे अशक्य

बँका 1 ऑक्टोबरला सुरू होणार आहेत आणि प्रवेश घेण्याची शेवटची तारीख ही एक आक्टोबर आहे. याच दिवशी डीडी काढून संबंधित महाविद्यालयात जमा करणे विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही. सोलापूरच्या एखाद्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नागपूरच्या महाविद्यालयात झाला असेल आणि त्या विद्यार्थ्याला एक ऑक्टोबरला सोलापूर येथून बँकेतून डीडी काढून नागपूर येथील महाविद्यालयात जाऊन तो डीडी जमा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा डीडी न दिल्याने प्रवेश रद्द होणार आह.

Solapur news
Solapur|मोहोळमध्ये शेटफळ येथे जमावाकडून घरांची तोडफोड; मारहाणीत अनेक जखमी

या सगळ्या किचकट प्रक्रियेतून मार्ग काढण्यासाठी सीईटी सेल, बँक कर्मचारी युनियन त्याचबरोबर केंद्र सरकारने त्याची दखल घेणे आवश्यक आहे. जर ही प्रक्रिया अशीच राहिली तर राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

Solapur news
Census 2026 : दुसऱ्या टप्प्यातील जनगणना प्रशिक्षणास प्रारंभ, ४० प्रश्नांची माहिती संकलन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news