Census 2026 : दुसऱ्या टप्प्यातील जनगणना प्रशिक्षणास प्रारंभ, ४० प्रश्नांची माहिती संकलन

प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र माहिती संकलित करण्यात येणार असून, त्यासाठी ४० प्रश्नांची माहिती घेण्यात येणार
Census 2026
Census 2026
Published on: 
Updated on: 

सोलापूर : प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र माहिती संकलित करण्यात येणार असून, त्यासाठी ४० प्रश्नांची माहिती घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रगणकांकडून माहिती संकलनाची प्रक्रिया अचूकपणे होण्यासाठी चार्ज अधिकाऱ्यांनी संपूर्ण कामकाजावर प्रभावी नियंत्रण व देखरेख ठेवणे आवश्यक आहे. जनगणनेची माहिती गोपनीय असून, ती माहिती कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला देऊ नये. पहिल्या टप्प्यातील कामकाजातील अनुभव व त्रुटी लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यातील कामकाज वेळेत व अचूकपणे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुंबई येथील जनगणना कार्य संचालनालयाच्या सहायक संचालक तेजल कटारे यांनी दिल्या.

जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षणावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, सांख्यिकी अधिकारी तुषार पाटील, तहसीलदार सीमा पटणे, नायब तहसीलदार नीलिमा मते, चार्ज अधिकारी तथा तहसीलदार मुख्याधिकारी, महानगरपालिका क्षेत्रातील चार्ज अधिकारी तसेच जनगणना कर्मचारी उपस्थित होते.

सहायक संचालक तेजल कटारे यांनी कामकाजात अचूकता आणि काटेकोरपणा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगून ज्या इन्युमरेशन ब्लॉकमध्ये लोकसंख्या ८०० पेक्षा अधिक आहे, अशा ब्लॉकची आवश्यकतेनुसार पुनर्रचना (रिसेटिंग) करण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी. यासाठी उपलब्ध पीपीटी, परिपत्रके तसेच जनगणना कार्य संचालनालयाने तयार केलेल्या प्रशिक्षणपर व्हिडिओचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपयोग करावा, असे सांगितले.

यावेळी सांख्यिकी अधिकारी तुषार पाटील यांनी प्रगणक तयार करण्याची सर्वसाधारण तत्त्वे, प्रगणक गट तयार करण्याची पद्धत, मांडणी दर्शक नकाशाचे पुनरावलोकन, गणना घराची निवड व वाटप, संक्षिप्त गृहसूची तसेच इन्युमरेशन ब्लॉकची अचूक निर्मिती व नोंदणी करण्याच्या पद्धतीबाबत पीपीटी तसेच सीएमएमएस पोर्टलच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news