Arbaz Shaikh : सैराटफेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख याच्या वडिलांचे उपचारादरम्यान निधन!

अरबाज शेखने पोस्ट टाकत हॉस्पिटलच्या मनमानीबद्दल व्यक्त केला होता संताप
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख याच्या वडीलांचे उपचारादरम्यान निधन!
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख याच्या वडीलांचे उपचारादरम्यान निधन!
Published on
Updated on

करमाळा: सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील असलम रसूल शेख वय 60 यांचे आज सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. अरबाज शेख यांच्या वडिलांना 29जून रोजी हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना प्रथम करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान तेथील डॉक्टरांनी औषध व गोळ्या आमच्या फार्मासिस्ट दुकानातूनच घ्याव्या लागतील अन्यथा तुमचा पेशंट घेऊन जा.. असे सांगितल्याने अरबाज शेख हा मराठी सिनेकलाकार असला त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्याने नैराश्यातून या हॉस्पिटलच्या मनमानीबद्दल सोशल मिडीयावर पोस्ट टाकून सदर रुग्णालय त्यांच्या औषधी दुकानातूनच औषधी घेण्याची सक्ती करत असल्याची पोलखोल केल्याने खळबळ माजली होती.

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख याच्या वडीलांचे उपचारादरम्यान निधन!
Arbaz Shaikh Hospital: 'सैराट' फेम अरबाज शेखच्या व्हिडिओनंतर FDA ची मोठी कारवाई; सोलापूरमधील हॉस्पिटलचं मेडिकल सील

शिव सेना वैद्यकीय कक्ष प्रमुख व उपमुख्यमंत्र्यांची स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार अरबाज शेख यांची भेट घेऊन त्यांना उपचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक लाख रुपयांचा धनादेश उद्योग मंत्री उदय सामंत व मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत अरबाज शेख यांना दिला व सोलापुरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये अरबाज च्या वडिलांना पुढील उपचारासाठी दाखल केले.

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख याच्या वडीलांचे उपचारादरम्यान निधन!
Arbaz Shaikh: 'माझ्या बापाला वाचवा...'; 'सैराट' फेम अरबाज शेख ढसाढसा रडला; रुग्णालयावर केले गंभीर आरोप, मदतीसाठी भावनिक साद

तेथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून अरबाज शेख यांच्या वडिलांच्या उपचारासाठी दीड लाख रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र त्‍यांच्यावर कोणतेही उपचारांचा उपयोग झाला नाही, शेवटी आज उपचारादरम्यान असलम रसूल शेख यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रात्री उशिरा करमाळा तालुक्यातील जेऊर येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये त्यांचा दफनविधी पार पडला यावेळी राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news