आयटीआयच्या राज्यात दीड लाख जागांसाठी पाच दिवसांमध्ये एक लाख अर्ज

आयटीआयच्या राज्यात दीड लाख जागांसाठी पाच दिवसांमध्ये एक लाख अर्ज
Published on
Updated on

सोलापूर : अंबादास पोळ : औद्योगिक प्रशिक्षण संस्था २०२२ ची प्रवेश प्रक्रिया १७ जून पासून ऑनलाइन स्वरूपात सुरू झाली.  यासाठी महाराष्ट्रातील सर्वच शासकीय व खाजगी आय टी आय साठी १ लाख ४९ हजार २६८ जागा उपलब्ध करून देण्यात आले आहे. पण अवघ्या पाच दिवसांमध्ये १ लाख ऑनलाईन अर्जाची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातील एकूण ९७२ आयटीआय पैकी ४१७ शासकीय व ४५० खाजगी आयटीआय आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात एकूण १३ शासकीय तर २५ खाजगी (आयटीआय) औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे आहेत. या माध्यमातून शासकीय संस्थांसाठी २७०० तर खाजगी संस्थांसाठी २४०० विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दहावी उत्तीर्ण अनुत्तीर्ण उमेदवारांना व्यवसायात प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे.

आयटीआयमध्ये पारंपरिक शाखेचे अभ्यासक्रमासोबतच नाविन्यपूर्ण रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये विविध अभ्यासक्रम कोर्स पैकी मेकॅनिक डिझेल ,मेकॅनिक मोटर व्हेईकल, वीजतंत्री, तारतंत्री, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट या कोर्ससाठी अधिक अर्ज आल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या महामारीतून सावरल्यानंतर पालकांसह विद्यार्थ्यांचा कौशल्याधारित अभ्यासक्रमात पेक्षा व्यवसायिक अभ्यासक्रमाकडे कल वाढत असल्याचे दिसून येते. आयटीआय मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगारांची संधी लवकर उपलब्ध होतात. अकरावी व इंजिनीअरिंगला प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ठरवून आयटीआयला प्रवेश घेतात.

राज्यातील एकूण आयटीआय व विद्यार्थी संख्या

शासकीय आयटीआय ४१९ जागा ९३ हजार ९०४
खाजगी आयटीआय ५५३ जागा ५५ हजार ३६४
एकूण आयटीआय ९७२ जागा १,४९,२६८

ऑनलाइन ऑफलाइन परीक्षांमुळे प्रवेशावर परिणाम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन स्वरूपात झाले. परीक्षा ही ऑनलाइन स्वरूपातच घेण्यात आल्या त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०१९-२० व २०२०-२१ च्या विद्यार्थ्यांना २०२१-२२ च्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक गुण संपादन केल्यामुळे यंदा मात्र मेरिटमध्ये मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन ऑफलाइन परीक्षाच्या गुणाचा विचार करता विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर नक्कीच याचा परिणाम होणार आहे.

प्रवेश प्रक्रिया १७ जूनपासून सुरू झाले असून पाच दिवसात एक लाख ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहे याचा सरळ अर्थ पालकांचा विद्यार्थ्यांचा व्यावसायिक शिक्षणाकडे कल वाढत आहे. अर्ज भरण्यासाठी तीन आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे जवळपास सहा लाखांच्या आसपास अर्ज येण्याची शक्यता आहे.
– मनोज बिडकर, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर 

हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news