जुन्नर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी | पुढारी

जुन्नर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा: गेल्या पंधरवाड्यापासून दडी मारलेल्या पावसाने जुन्नर तालुक्यात बुधवारी व गुरुवारी (दि. 23) सर्वत्र हजेरी लावली. गुरुवारी सुरू झालेल्या संततधार पावसाने नंतर विजांच्या गडगडाटासह मुसळधार रूप धारण केले होते. त्यामुळे शहरी भागातील अनेक रस्त्यांवर तसेच गावोगावातील शेतांमध्ये पाणी साचले. पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम भागांतील भात रोपांच्या पेरणीला वेग येणार आहे.

सोयाबीन, कांदा, पालेभाज्या तसेच फुलशेतीला हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान, तालुक्यातील वडज, निरगुडे, येणेरे, आपटाळे, घाटघर, आंबोली आदी अनेक गावांमध्ये वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने ग्रामस्थांची धांदल उडवली. पावसामुळे गहू, हरभरा आणि आंब्याचे काही ठिकाणी नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री टाकण्याची लगबग उडाली.

हेही वाचा

भय इथले संपणार कधी..?

खडकवासला धरणसाखळीवर पाऊस रुसला; गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के पाऊस

मंत्रिपदासाठी गुवाहाटीला जाणे ही गद्दारी! : जयेंद्र परूळेकर

Back to top button