खा. शिंदेंना वयोमानानुसार लाडकी बहीण योजना कळेल

नीलम गोर्‍हे यांची खा. प्रणिती शिंदेंवर टीका
Neelam Gorhe
नीलम गोर्‍हे यांची खा. प्रणिती शिंदेंवर टीका Pudhari News Network
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

खा. प्रणिती शिंदे यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना वयाच्या 85 वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्त्व कळाले. खा. शिंदे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहेत. त्यामुळे खा. शिंदे यांना वयोमानानुसार वडिलांप्रमाणे उतारवयात लाडकी बहीण योजना समजेल, अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी केली.

Neelam Gorhe
भंडारा | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे कर्ज खात्यात वळते

नीलम गोर्‍हे या रविवार, दि. 6 रोजी सोलापूर दौर्‍यांवर आल्या होत्या. शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी टीका केली. पूर्वी टेबलाखालून भ्रष्टाचार केला जायचा; मात्र आता सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना टेबलवरून लाच देऊन भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप खा. प्रणिती शिंदे यांनी केला होता. या संदर्भात गोर्‍हे यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, खा. शिंदे यांच्या वडिलांना वयोमानानुसार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्त्व कळले त्याचप्रमाणे खा. शिंदे यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महत्त्व वयोमानानुसार कळेल आणि एकनाथ शिंदेदेखील उमजतील, अशी खोचक टीका केली. लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक गैरसमज निर्माण करत आहेत. महिलांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून सरकारने टाकलेले हे पाऊल आहे.

राजकीय इच्छाशक्ती दाखवत सरकार महिलांच्या पाठीशी उभे राहिले आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक स्थान बळकट करण्यासाठी योजना आहे. ही लाच, दया, भिक म्हणून दिली जात नाही.महाराष्ट्राचे राजकारण दर तीन दिवसांनी बदलत आहे. त्यामुळे राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही. काही लोक उभे राहत नाहीत. काहींचे अजून काय होते हे माहित नाही तर काहीजण मुलाला उभे करायचे ठरवतात मात्र मुलगा वेगळं बोलतो आणि वडील वेगळ बोलतात अशी टिकाही त्यांनी काही नेत्यांवर नाव न घेता केली. यावेळी शिवसेना सचिव संजय मशीलकर, ज्योती वाघमारे, प्रा. शिवाजी सांवत, अमोल शिंदे, मनिष काळजे, मनोज शेजवाल उपस्थित होते.

Neelam Gorhe
Supriya Sule | लोकसभेतील पराभवामुळे लाडकी बहिण आठवली

जिल्ह्यात पाच मतदार संघांवर दावा

सोलापूर जिल्हातील पाच मतदार संघांवर शिंदे गटाने दावा सांगितला आहे. ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराबरोबर सामना होतो, तिथे शिंदे गट विजयी होतो. त्यामुळे जिथे ठाकरे गटाचे उमेदवार दिले जातात. तिथे आमचे उमेदवार असणार आहेत. भाजप आणि शिवसेनेची खूप वर्षांची युती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news