भंडारा | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे कर्ज खात्यात वळते

व्यवस्थापकाने  कोर्टात टाकण्याची दिली धमकी, महिलांचा आरोप
Majhi Ladki Baheen' scheme
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे कर्ज खात्यात वळतेPudhari File Photo
Published on
Updated on

भंडारा: राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करून महिलांना आर्थिक सक्षम बनविण्याचा विडा उचलला. त्यासाठी पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणे सुरू केले. मात्र काही बँकांनी लाडकी बहिण योजनेचे पैसे पात्र लाभार्थ्यांना न देता त्यांच्या कर्ज खात्यात जमा केल्याने योजनेच्या लाभापासून महिलांना वंचित राहावे लागत आहे. उलट पैसे भेटणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, तुम्हाला कोर्टात टाकू अशी उलट धमकी बँक व्यवस्थापकाने महिलांना दिली आहे.

महिलांची बोळवण केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील परसोडी नाग येथील ग्रामीण बँकेत घडली आहे.  सदर व्यवस्थापकाच्या विरोधात तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

लाखांदूर तालुक्यातील राजनी येथील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मंजूर झाली असून, दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये मिळाले. आता तिसरा हप्ता जमा झाल्याने राजनी येथील महिला ग्रामीण बँक परसोडी नाग येथे पैसे काढण्यासाठी गेल्या असता बँक व्यवस्थापकाने पैसे देण्यास नकार दिला. महिलांनी विचारपूस केली तर तुमच्या कर्ज खात्यात पैसे वळती करण्यात आल्याचे सांगितले. उलट व्यवस्थापकाने महिलांचा अपमान करीत कोर्टात टाकण्याची धमकी दिल्याचे आरोप महिलांनी केला आहे. तहसीलदार वैभव पवार यांच्याकडे तक्रार देताना सामाजिक कार्यकर्ते देवचंद कावळे, हिरकन्या तेलमासरे, सुनीता वकेकार, निर्मला वकेकार उपस्थित होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news