

Massive fire breaks out at factory in MIDC area of Solapur, three dead
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील सेंट्रल टेक्स्टाईल कंपनीमध्ये आज (रविवार) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीत सेंट्रल टेक्स्टाईल कंपनीत आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुर्देवाने तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे तर आणखी काही लोक आतमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली. आगीची तीव्रता पाहता अग्निशामक दलाची दहा वाहने आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सोलापूर महापालिकेचे अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळुंखे तसेच एक कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवताना अंशतः भाजले गेले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अजूनपर्यंत समजू शकलेले नाही अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली.