Manohar Joshi : युतीचे सरकार येताच मनोहर जोशींनी तुळजाभवानीला घातले होते साकडे

Manohar Joshi : युतीचे सरकार येताच मनोहर जोशींनी तुळजाभवानीला घातले होते साकडे

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा: भाजप- शिवसेना युती सरकारच्या सत्ता काळात 1997 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूरला भेट दिली होती. त्यांचे परंपरागत उपाध्ये पुजारी भालचंद्र पाठक यांनी त्यांचे स्वागत केले होते. Manohar Joshi

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रामध्ये शिवशाही अवतीर्ण झाली आहे. या राज्यातील शेतकऱ्याला सुखी करण्यासाठी चांगले काम करण्याची शक्ती मला तुळजाभवानी देवीने द्यावी, असे साकडे तुळजाभवानीच्या चरणी घातल्याचे जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. Manohar Joshi

याप्रसंगी भाजपचे नेते अनंत कोडो, शिवसेना नेते श्याम पवार जयप्रकाश दरेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. जोशी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जुन्या स्मृतींना तुळजापूर शहरामध्ये उजाळा मिळाला. अनेक नव्या जुन्या कार्यकर्त्यांनी मनोहर जोशी यांच्याशी आलेले संबंध बोलून दाखवले.

देवीचे उपाध्ये पुजारी भालचंद्र पाठक म्हणाले की, मनोहर जोशी यांचे कुटुंब परंपरागत पद्धतीने आमच्याकडे तुळजाभवानी देवीचा कुलधर्म करण्यासाठी अनेक वेळा आलेले आहेत. देवीचा प्रसाद मनोहर जोशी यांच्यापर्यंत प्रतिवर्षी पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही उपाध्ये पुजारी म्हणून करत असतो.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news