

कडा :-राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानभवनातील कथित जंगली रम्मी गेम खेळण्याच्या व्हिडिओवरून सुरू असलेला वाद आता राज्यभरात अधिकच चिघळला आहे. आष्टी तालुक्यात त्याचे पडसाद दिसून आले. एकीकडे शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळ झाला असताना राज्याचे कृषिमंत्री जंगली रम्मीचा खेळ खेळत असल्याचे दिसून आले.
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील सामजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके,अशोक माने व शेतकऱ्यांनी कृषिमंत्ररी कोकटेंचा फोटो लावून त्यांच्या सोबत आपल्या शेताच्या बांधावर जाऊन प्रतिकात्मक रम्मी खेळून कोकाटे यांच्या कृतीचा निषेध म्हणून बांधावर रमी खेळत धिक्कार केला आ.रोहित पवार यांनी कोकाटे यांचा विधानभवनात अधिवेशन सुरु असताना रम्मी गेम खेळतानाचा व्हिडीओ ट्विट केला.
तेव्हापासून कोकाटे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना कृषीमंत्री सभागृहात गेम कसे खेळू शकतात? असा सवाल करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परंतु कोकाटेंनी केविलवाणा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मी रमी खेळलो नाही, रम्मी मला खेळता येत नाही. माझ्यावर झालेले आरोप बिनबुडाचे असून ज्यांनी आपली बदनामी केली त्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा कोकाटे यांनी दिला होता. परंतु तरीही कोकाटे यांच्या विरोधातील विरोधकांचा राग काही कमी होतांना दिसत नाही. उलट तो अधिक वाढल्याचे चित्र आहे.
एकीकडे राज्यातील शेतकरी अस्मानी संकटात आहे, अशा परिस्थिती कृषिमंत्र्यांनी जबाबदारीने विधानं करायचे असतात. जबाबदारीने निर्णय घ्यायचे असतात. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायची असतात पण राज्याचे कृषीमंत्री विधानभवनात ऑनलाइन रमीचा गेम खेळतात. तमाम महाराष्ट्रातल्या तरुणांना ऑनलाइन गेम खेळून आयुष्य नष्ट करण्यासाठी ते प्रेरित करत असल्याचा आरोप यावेळी शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केला. कृषी मंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली.