

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आज (दि.२९) सकाळी महत्त्वपूर्ण बैठक झाली. विधानपरिषदेत वादग्रस्त वक्तव्ये आणि सभागृहात रमी खेळल्याच्या प्रकरणावरून कोकाटे अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कोकाटे यांच्यावर आज भेटीदरम्यान स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत कोकाटे यांना सुनावले की, “तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आणि वागताना भान ठेवायला हवे.” यावेळी अजित पवार यांनी कोकाटे यांचे कान टोचले आणि कार्यकर्त्यांनाही खडसावले. “अनेकवेळा माफ केलं, आता माफ करू शकत नाही,” असेही पवार यांनी ठणकावून सांगितले.
"तुम्हाला किती वेळा समजवायचे. आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं आता हा विषय पुढे गेला आहे. माणिकरावांकडून सतत चुका होतायत आता माफी नाही. आता राजीनामा नको म्हणून आलात, मंत्री पद नको मच्या राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव येत असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे". यावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापुढे बोलताना वागताना काळजी घेईन, असे प्रतिक्रिया कोकाटे यांनी यावेळी दिले आहे.
या बैठकीस मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी कोकाटे यांचा राजीनामा घेण्याचे संकेत दिले होते. मात्र मंत्रिमंडळ बैठकीआधी झालेल्या या चर्चेनंतर कोकाटे यांचा राजीनामा तुर्तास तरी घेतला जाणार नसल्याचे समजते. तसेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची बैठक झाल्यानंतरच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार की खाते बदलणार? याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.