सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जाहीर

सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जाहीर

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जाहीर करण्यात आला. याबद्दलची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी आज (दि.२७) पत्रकार परिषदेत दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात.

सोलापूर विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यात सोलापूर ही जन्मभूमी, कर्मभूमी आणि ऋणानुबंध असणार्‍या व्यक्तीस जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी उदय लळीत हे ठरले आहेत. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी लळीत यांना विनंती केली होती, त्यांनी सदरील विनंती स्वीकारली आहे. रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

१ ऑगस्ट २०२३ रोजी विद्यापीठाचा १९ वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे. सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी नऊ वाजता सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

या समारंभास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यांना जाहीर झाले पुरस्कार :

  • उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर
  • उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार : प्राचार्य डॉ. शंकर नवले, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर आणि प्राचार्य
  • डॉ. राजशेखर हिरेमठ, श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर
  • उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ): डॉ. रवींद्र चिंचोलकर, सामाजिकशास्त्रे संकुल, डॉ. राजीवकुमार मेंते, संगणकशास्त्र संकुल
  • उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय): प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर,
  • प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर
  • उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार: डॉ.अभिजीत जगताप, वैद्यकीय अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर
  • विद्यापीठ, डॉ. उमराव मेटकरी, उपकुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news