Japan Open : सात्विक-चिराग जोडीसह प्रणॉय, लक्ष्य सेन यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक | पुढारी

Japan Open : सात्विक-चिराग जोडीसह प्रणॉय, लक्ष्य सेन यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

टोकियो, पुढारी वृत्तसंस्था : japan open 2023 badminton championship : जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जबरदस्त खेळ केला आहे. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने गुरुवारी बीडब्ल्यूएफ जपान ओपन सुपर 750 च्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांच्याशिवाय एचएस प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांनीही बाजी मारली. दुसरीकडे ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद पुलेला या भारतीय जोडीला महिला दुहेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

लक्ष्य सेनने केला जपानच्या त्सुनेयामाचा पराभव

एचएस प्रणॉयने दुसऱ्या फेरीत देशबांधव किदाम्बी श्रीकांतचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रणॉयने श्रीकांतचा 19-21, 21-9, 21-9 असा पराभव करत शानदार विजयाची नोंद केली. त्याचवेळी लक्ष्यने जपानच्या कांता त्सुनेयामाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याने त्सुनेयामावर 21-14, 21-16 अशी मात केली. (japan open 2023 badminton championship)

सात्विक-चिरागचा डेन्मार्क जोडीवर सहज विजय

कोरिया ओपन जिंकणाऱ्या सात्विक-चिराग या जोडीने डेन्मार्कच्या लासे मोल्हेदे आणि जेप्पे बे यांचा 21-17, 21-11 असा सहज पराभव केला. महिला दुहेरीची जोडी ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद पुलेला यांना स्पर्धेतून बाद व्हावे लागले आहे. त्यांना जपानच्या चिहारू शिदा आणि नामी मत्सुयामा या जोडीने 21-23, 19-21 ने पराभूत केले. (japan open 2023 badminton championship)

सिंधूचा निराशाजनक कामगिरी

पीव्ही सिंधूला बुधवारी पहिल्या फेरीत चीनच्या झांग यी मॅनकडून 21-12, 21-13 ने पराभूत व्हावे लागले. हा सामना 32 मिनिटांमध्येच संपला. झांग यी मॅनने दोन्ही गेम सहज जिंकले. यापूर्वी कोरिया ओपन 2023 मध्येही सिंधूला पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते. (japan open 2023 badminton championship)

जपान ओपनचा पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता क्रमवारीवर होणार परिणाम

पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता क्रमवारीवर जपान ओपनचा परिणाम होऊ शकतो. जपान ओपनचे निकाल पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीसाठी 2024 च्या क्रमवारीत मोजले जातील. बॅडमिंटनसाठी पात्रता विंडो या वर्षी 1 मे पासून सुरू झाली आहे.

Back to top button