Solapur News: गंगेवाडी खाणीत बेपत्ता असलेल्या १० वर्षीय यशचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला

गंगेवाडी परिसरातील दगड खाणीत बुडाल्याची शक्यता असलेला यश हरी हब्बू (वय १०, रा. कासेगाव) हा विद्यार्थी अखेर चौथ्या दिवशी मृत अवस्थेत आढळून आला.
Kasegaon News
Kasegaon Newspudhari
Published on
Updated on

Solapur News

कासेगाव: गंगेवाडी परिसरातील दगड खाणीत बुडाल्याची शक्यता असलेला यश हरी हब्बू (वय १०, रा. कासेगाव) हा विद्यार्थी अखेर चौथ्या दिवशी मृत अवस्थेत आढळून आला. रविवारी पहाटे खाणीच्या पाण्यावर त्याचा मृतदेह तरंगताना दिसल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Kasegaon News
Barshi college student kidnapping: कॉलेज विद्यार्थिनीचे अपहरण, अत्याचार

मागील तीन दिवसांपासून अग्निशमन दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच आपदा मित्रांकडून यशचा शोध घेण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करून शोधमोहीम राबविण्यात येत होती. पाण्याची खोली व खाणीच्या तलावाची रुंदी मोठी असल्याने हे प्रयत्न निष्फळ ठरत होते. तीन दिवस सुरू असलेल्या या शोधमोहीमेदरम्यान ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित राहून पथकाला सहकार्य करत शोध कार्यात मदत केली.

दरम्यान, रविवारी (दि. १५) सकाळी नेहमीप्रमाणे यशचे चुलत आजोबा तुकाराम हब्बू आपल्या मुलासह खाणीच्या परिसरात गेले असता त्यांना दूरवर पाण्यावर काहीतरी तरंगत असल्याचे दिसले. जवळ जाऊन पाहणी केली असता तो यशचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्यांनी तात्काळ गावकरी व पोलिसांना याची माहिती दिली.

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली. पोस्टमार्टमनंतर दुपारी यशवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या यशचा मृतदेह आढळल्याने हब्बू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यशचा मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कासेगाव परिसर शोकाकुल झाला आहे.

यश हा अत्यंत हुशार व गुणी विद्यार्थी होता. त्याचे आजोबा भजन-कीर्तनाशी जोडलेले असल्याने यशही त्यांच्या सोबत भजन व कीर्तन कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असे. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान बहीण, आजी-आजोबा, काका-काकू असा परिवार आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती व मोलमजुरीवर चालत असल्याने या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या घटनेनंतर शासनाने तसेच सामाजिक संस्थांनी हब्बू कुटुंबाला भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थ व नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Kasegaon News
Solapur Accident: कारची कंटेनरला धडक, दोन तरुण ठार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news