

Kem Villagers MSEB Agitation
केम: करमाळा तालुक्यातील कुंकवासाठी प्रसिद्ध असलेल्या केम गावात मागील नऊ वर्षापासून कुंकू कारखानदार यांनी पाठपुरावा करून जेऊर 220 के व्ही सबस्टेशन मंजूर केले होते. स्वतंत्र 33 के.व्ही साठी आठ किमी लाईन केमसाठी मंजूर करून घेतली आहे. या लाईनचे टेंडर दोन वर्षापूर्वी मंजूर झाले आहे. केम गावातून जेऊर उपविभागात सर्वाधिक वीज बील भरणा केला जातो. तरीही विजेची समस्या कायम आहे. याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून 24 जूनला जेऊर येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
दरम्यान, आमदार नारायण पाटील यांनी उपोषण स्थळी येऊन कुंकू कारखानदार यांच्याशी चर्चा केली. या कामासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच महावितरण विभागाचे अधिकारी भोईर यांनी या लाईनचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे व स्वतंत्र बे ब्रेकर वरून वीज पुरवठा कार्यान्वित करण्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर हे पत्र सचिव मनोज सोलापूरे यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थांना वाचून दाखविले. त्यानंतर सर्व संमतीने हे उपोषण स्थगित करण्यात आले.
उपोषण कर्त्याला भोईर यांनी लिंबू पाणी देऊन हे उपोषण सोडण्यात आले. या वेळी सरपंच सारिका कोरे, उपसरपंच सागर कुडें, माजी सरपंच अजित तळेकर, राहुल कोरे, माजी सभापती शेखर गाडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सागर दौंड, उपाध्यक्ष सागर तळेकर, अच्युत पाटील, महेश तळेकर, संदिप तळेकर, नितीन खटके, गोरख पारखे, गोरख खानट, श्री हरी तळेकर, विजयकुमार बलदोटा, धनंजय सोलापूरे, गोपी शिंदे, भालचंद्र गुटाळ, महावीर तळेकर, बापुराव तळेकर, पी.पी. वासकर, महेश घाडगे, अक्षय गोडसे, काका भिस्ते, किरण तळेकर, दत्ता तळेकर, सुभाष कळसाईत, अनिल भिस्ते, बाळासाहेब देवकर, दत्ता बिचितकर, भैरू शिंदे, आपा वैद्य, सुदर्शन भिस्ते, गणेश शिंदे, विजय ओहोळ, सचिन बिचितकर, बाळू बिचितकर, शुभम शिंदे, हरि शिंदे, कुंकू कारखान्यातील कामगार, ग्रामस्थ उपस्थित होते.
पाठिंबा देऊन जर वीज वितरण कंपनीने हे काम न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके यांनी दिला.