BJP Solapur President | पहिल्यांदाच करमाळा तालुक्याला भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा मान; गणेश चिवटे यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड

पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी गणेश चिवटे यांची भाजप सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
Solapur BJP  President Ganesh Chivate Appointment
Solapur BJP President Ganesh Chivate AppointmentPudhari
Published on
Updated on

Solapur BJP President Ganesh Chivate Appointment

करमाळा : करमाळा तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा मान मिळाला असून, पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी गणेश चिवटे यांची भाजप सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक प्रस्थापित दावेदारांमध्ये पक्षाने निष्ठावंत आणि संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कार्यकर्त्याची निवड करून कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची भूमिका अधोरेखित केली आहे.

गणेश चिवटे यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात बजरंग दलातून केली. विद्यार्थी जीवनापासूनच ते भारतीय जनता पक्षाशी सक्रियपणे जोडले गेले. युवकांचे मजबूत संघटन उभारणे, पक्षविस्तार आणि संघटनात्मक कामात त्यांनी सातत्याने योगदान दिले. भाजपच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लावण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

Solapur BJP  President Ganesh Chivate Appointment
Solapur news: मोहोळ शहरात रिक्षाचालकांना गणवेश अनिवार्य; बेकायदा स्टॉलधारकांवर कारवाईचा इशारा

त्यांचा संघटनात्मक प्रवास युवक मोर्चा तालुकाध्यक्ष, भाजप तालुकाध्यक्ष, युवक मोर्चा जिल्हाध्यक्ष, भाजप जिल्हा सरचिटणीस आणि आता जिल्हाध्यक्ष असा टप्प्याटप्प्याने झाला आहे. याशिवाय नगरसेवक आणि बांधकाम समिती सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

सामाजिक क्षेत्रातही त्यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून अन्नदान योजना, सामुदायिक विवाह सोहळे आदी उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. दूध व्यवसायातून स्वतः प्रगती साधतानाच अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तसेच अनेक शेतकऱ्यांना दूध उत्पादक म्हणून सक्षम करण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी चिवटे या वीट गटातून विक्रमी मतांनी विजयी झाल्या असून, चिवटे कुटुंबाच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचीही दखल घेतली जात आहे.

Solapur BJP  President Ganesh Chivate Appointment
Solapur Kurduwadi Civil Court | सोलापूर, कुर्डूवाडी येथे नवीन न्यायालयाला मंजुरी

संघाचे संस्कार, पक्षनिष्ठा आणि संघटन उभारणीतील अनुभवाच्या बळावर गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर पश्चिम ग्रामीण भागात भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, असा विश्वास पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

गणेश चिवटे यांच्या नियुक्तीमुळे करमाळा तालुक्याला प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा मान मिळाला असून, तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news