राज्यात पाच पोलीस अधिकाऱ्यांना आयपीएस दर्जा

राज्यात पाच पोलीस अधिकाऱ्यांना आयपीएस दर्जा

सोलापूर: पुढारी वृत्तसेवा: राज्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांना आयपीएस दर्जा मिळाला आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २००३ च्या बॅचच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

भारतीय पोलीस सेवेत यावर्षी महाराष्ट्र संवर्गातून ५ अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. यामध्ये श्रीकांत धिवरे (एसपी सीआयडी पुणे युनिट), प्रकाश जाधव (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर), विनय राठोड (पोलीस उपायुक्त झोन ५ ठाणे शहर), अश्विनी सानप (एसपी, सिक्युरिटी कॉर्पोरेशन) आणि रश्मी करंदीकर (एसपी नागरी संरक्षण) यांना आयपीएस दर्जा मिळालाआहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. आयपीएसचा दर्जा ज्येष्ठतेनुसार मिळतो. सचोटी आणि चांगले  रेकॉर्ड आणि करिअर शीटवर एकही प्रतिकूल नोंद असून चालत नाही.
आयपीएस दर्जा मिळालेले अधिकाऱ्यांना हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये काही महिन्यांसाठी आयपीएस इंडक्शन कोर्स करावा लागणार आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news