In Karmala-Kurduwadi road accident, both brothers died
file photoFile Photo

Solapur Accident : करमाळा-कुर्डूवाडी रोड अपघातातील जखमीची मृत्‍यूशी झुंज अपयशी, दोन्ही भावांचा मृत्‍यू

१८ जुलै रोजी अपघात झाला होता, हिवरे गावावर शोककळा

करमाळा : पुढारी वृत्‍तसेवा

करमाळा-कुर्डूवाडी रस्त्यावर १८ जुलै रोजी अपघात झाला होता. यामध्ये दोघा भावांपैकी एका भावाचा अपघातस्‍थळीच मृत्‍यू झाला होता, तर दुसऱ्या जखमी भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे हिवरे गावावर शोककळा पसरली आहे. (Solapur Accident)

In Karmala-Kurduwadi road accident, both brothers died
Budget 2024 Updates Income tax |अर्थसंकल्पातून पगारदारांना मोठा दिलासा, आता १७,५०० रुपये आयकर वाचणार

बाळासाहेब शिवलाल चव्हाण वय (२८) रा हिवरे तालुका करमाळा असे उपचारादरम्यान मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. तर नागनाथ तुकाराम शिंदे (वय ३०) रा हिवरे तालुका करमाळा असे जागीच ठार झालेल्याचे नाव आहे. हा अपघात करमाळा- कुर्डूवाडी रस्त्यावर पांडे गावाजवळ (ता.१८) गुरुवारी दुपरी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला होता.(Solapur Accident)

In Karmala-Kurduwadi road accident, both brothers died
Budget 2024 ची PDF फाईल डाउनलोड करा फक्त एका क्लीकवर!

या विषयी अधिक माहिती अशी की, हिवरे येथील नागनाथ शिंदे हे दुचाकी क्रमांक एम एच ४५ ए. एस./१०२१ वरून करमाळ्यातील कामे उरकून त्याचा आतेभाऊ बाळासाहेब चव्हाण याच्या समवेत गावाकडे निघाला होता.(Solapur Accident)

In Karmala-Kurduwadi road accident, both brothers died
ब्रेकिंग न्‍यूज : NEET ची पुनर्परीक्षा घेता येणार नाही : सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निर्वाळा

करमाळा-कुर्डवाडी रस्त्यावर पांडे गावाजवळ १८ जुलै रोजी त्‍यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये हिवरे येथील नागनाथ तुकाराम शिंदे वय (३२) हा युवक जागेवरच ठार झाला होता, तर त्याचा आतेभाऊ बाळासाहेब शिवदास चव्हाण वय (३३) याचा पाय तुटून गंभीर जखमी झाला होता.(Solapur Accident)

In Karmala-Kurduwadi road accident, both brothers died
टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांची अर्थसंकल्पावर टीका

अज्ञात वाहनाचा वेग ऐवढा होता की बाळासाहेब चव्हाण या युवकाचा पाय तुटल्यावर तो पाय त्या वाहना सोबतच अडकुन गेला. परंतू अपघातातील वाहन कोणते होते याची अद्याप कोणालाच कल्पना नाही. अद्याप पर्यंत जखमी बाळासाहेब चव्हाण यांच्या पायाचाही तपासही लागलेला नाही. अज्ञात वाहनाचाही तपास लागलेला नाही.(Solapur Accident)

In Karmala-Kurduwadi road accident, both brothers died
Gold Prices Today | खुशखबर! अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सोने ४,२०० रुपयांनी स्वस्त

अपघातानंतर बाळासाहेब चव्हाण याला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर प्रथमोपचार करून सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र चार दिवसांनी बाळासाहेब चव्हाण यांची मृत्यूशी झूंज अपयशी ठरली. दि. २२ जुलै रोजी त्याची देखील प्राणज्योत मालवली आहे. त्याच्यावर हिवरे गावी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.(Solapur Accident)

logo
Pudhari News
pudhari.news