

Illegal Tree Cutting: Forest Department Conducts Raids at Seven Locations in Jafrabad Taluka
टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यात अवैध वृक्षतोड होत असल्याच्या तक्रारी वन विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तालुक्यात वनविभागाच्या पथकाने सात ठिकाणी छापे मारून या छाप्यात सुमारे ६०.३०० घनमीटर साठून ठेवलेले लाकूड जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, जाफराबादमधील सामीउल्ला खाँ शफीउल्ला खाँ यांच्या मालकी गट क्र २२ मधून बेहडा व आंबा प्रजातीचे लाकडे ज्याचे एकूण ५.३९० घनमीटर लाकूड, अरबी शाळे समोर धाड टाकून मोहम्मद नूर मोहम्मद नईम यांच्याकडून ६.७३३ घन मीटर लाकूड, अरबी शाळेच्या मागच्या बाजूला सय्यद अकबर सय्यद अहेमद यांच्याकडून ४.१६१ घन मीटर लाकूड जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई वन संरक्षक छत्रपती संभाजी नगर प्रमोदचंद लाकरा, उप वन संरक्षक छत्रपती संभाजीनगर श्रीमती सुवर्णा माने, सहायक वन संरक्षक रोहयो व वन्यजीव जालनाचे सुदाम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती नीता फुले वन परिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर यांच्या नेतृत्वाखाली योगेश डोमळे वन परिमंडळ अधिकारी भोकरदन, वनरक्षक जाफराबाद संभाजी हटकर, वनरक्षक भोकरदन द्यानेश्वर पवार, वनरक्षक उज्जेन पुरी सुदाम राठोड, वनरक्षक रोपवाटिका जालना श्याम यमगर वनरक्षक बदनापूर, वैजीनाथ नागरे, वन सेवक भाऊ व्यवहारे, श्याम गव्हाणे, मोमिन तडवी, योगेश रगडे, मंगेश सपकाळ, अनुप, पांडुरंग डोंगरे आदींनी केली.
या ठिकाणी मारले छापे
न्यू जाफराबाद पुनर्वसन परिसरामध्ये धाड टाकून उस्मान शहा सय्यद अली शहा यांच्याकडून ३.९१८ घन मीटर लाकूड, मराठवाडा सॉमीलध-ारक मीजबहोद्दीन मोहिजोद्दीन शेख यांच्या वर कारवाई करुन ८.५३७घनमीटर लाकूड, टेंभुर्णीमधील अमोल सॉमील येथून अभिषेक पिंपळे यांच्याकडून २२.०४३ घन मीटर लाकूड, टेंभुर्णीमधील कुंभारझरी रोडला लागून असलेल्या पाटा जवळ फेरोज खाँ अहेमद खाँ पठाण यांच्याकडून ९.६०० घन मीटर माल जप्त करण्यात आला. यामुळे जाफराबाद, भोकरदन तालुक्यातील लाकूडमाफियांचे धाबे दणाणले आहे.